AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS vs Shivsena : शिवसेनेचा रंग हिरवा झाला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनं पुन्हा डिवचलं, शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि मनसे यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी आपण पाहिलीय. पुन्हा एकदा याच मुद्याला धरुन मनसेनं शिवसेनेला डिवचलंय.

MNS vs Shivsena : शिवसेनेचा रंग हिरवा झाला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनं पुन्हा डिवचलं, शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
मनसेचं शिवसेना भवनसमोरील बॅनरImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 9:57 AM
Share

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी चालू असतात. यातच मनसेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरुन शिवसेनेला डिवचलंय. मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं शिवसेनेवर टीका केलीय. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला मनसेनं हिंदुत्वाचीच आठवण करुन देत काही सवाल केले आहेत. शिवसेना भवनसमोर (Shivsena Bhavan) मनसेनं लावलेल्या बॅनरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. मनसेची शिवसेनेविरोधात ही काही पहिली बॅनरबाजी नाही. यापूर्वी देखील मनसेनं शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी करुन शिवसेनेला लक्ष्य केलंय. मात्र, आता पुन्हा एकदा मनसेनं शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करुन दिल्याचं दिसतंय. शिवसेना भवनसमोरील मनसेचं हे बॅनर चांगलंच चर्चेत आलंय.

बॅनरवर नेमकं काय आहे?

बॅनरमध्ये लिहिलंय की,  ‘माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालतायेत हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता मा. राजसाहेब ठाकरे चालवत आहेत जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या. सेनेचं हिंदुत्व हे केव्हाच संपलं आहे बाळासाहेब गेल्यावर हिंदुत्व निघून गेलं. आता सेनेचा रंग हिरवा झाला आहे.’ अशी टीका मनसेच्या बॅनरमध्ये करुन शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करुन देण्यात आली आहे.

यापूर्वी देखील डिवचण्याचा प्रयत्न

यापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे’, अशा आशयाचा बॅनर सेनाभवनासमोर लावण्यात आला होता. तो बॅनरही शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क परिसरात लावला होता. विशेष म्हणजे लावण्यात आलेल्या गुडीपाडव्याच्या बॅनरमधून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तब्बल 20 फुटाचा बॅनर होता. लोकांचं लक्ष वेधून घेत असलेल्या बॅनरची चर्चा त्यावेळी झाली होती.

हिंदुत्व आणि राजकारण

शिवसेना आणि मनसेवर नेहमी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करत असल्याची टीका केली जाते. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन दोन्ही पक्षांच्या नेते मंडळींकडून भाषणबाजी तर होतेच. याशिवाय अनेकदा चिथावणीखोर भाषणं होत असल्याचंही अनेदा बोललं जातं. दोन्ही प्रादेशिक पक्ष हिेदुत्वाचा पुरस्कार करतात. कुणाचं हिंदुत्व मोठं, किंवा आम्ही हिंदुत्वासाठी किती आग्रही, हे दाखवण्याचा प्रयत्न या दोनही पक्षांकडून अनेकदा झालाय. आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन नव्याने सुरु असलेली ही बॅनरबाजी वाढते की शमते, हे पाहणं महत्वाचं ठरेलं.

इतर बातम्या

Nagpur Crime | नागपुरात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या बंगल्यात चोरी, धक्काबुक्की करून मारहाण केल्याची माहिती

Fact Check | घर भाडे आणि दुकानावर 12 टक्के जीएसटी आकारणार नाही, तुम्हीसुद्धा या अफवेने एप्रिल फूल?

Shahid Kapoor: “मला तुझ्यासोबत राहायचं नाही”; पत्नी मीराचे हे शब्द ऐकताच शाहिदला बसला धक्का!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.