Fact Check | घर भाडे आणि दुकानावर 12 टक्के जीएसटी आकारणार नाही, तुम्हीसुद्धा या अफवेने एप्रिल फूल?

एप्रिलच्या एक तारखेला एप्रिल फूल करण्याची प्रथा आहे, परंतू, काही जण वर्षात कधीही काही पुंगानी सोडून देतात. आता बघाना, घरभाडे आणि दुकानावर 12 टक्के जीएसटी लागणार असल्याची अफवा सर्वदूर पसरली आहे. त्याची दखल घेत सरकारची अशी कोणती ही मनिषा नसल्याचे तातडीने कळविण्यात आले आहे. पीआयबीने याविषयी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे.

Fact Check | घर भाडे आणि दुकानावर 12 टक्के जीएसटी आकारणार नाही, तुम्हीसुद्धा या अफवेने एप्रिल फूल?
मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाईImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 9:43 AM

Fact Check : समाज माध्यमांवर वर्षभर एप्रिल फूल सुरु असते. ‘अनंत वाचाळ बरळती बरळ’ असली या माध्यमाची त-हा असते. आता सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे, त्याने सध्या धुमाकूळ घातला आहे. एप्रिलच्या एक तारखेला एप्रिल फूल करण्याची प्रथा आहे, परंतू, काही जण वर्षात कधीही काही पुंगानी सोडून देतात. आता बघा ना, घरभाडे आणि दुकानावर 12 टक्के जीएसटी (GST) लागणार असल्याची अफवा समाज माध्यमातून सर्वदूर पसरली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या छायाचित्रासह हा मॅसेज भामट्यांनी व्हायरल केल्याने त्याचा पडताळा घेणे आवश्यक होते. सरकारने लागलीच या मॅसेची दखल घेतली. असा कर आकारण्याची कुठलीही मनिषा नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. सरकारची अधिकृत प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) यांच्यामार्फत या व्हायरल मॅसेजच्या सतत्येविषयी माहिती देण्यात आली. पीआयबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा खोडसाळपणा उघड केला आणि अफवा असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

जीएसटीविषयी निर्णय घेण्यासाठी जीएसटी परिषदेची बैठक वारंवार होते, ही गोष्ट खरी आहे. तसेच या परिषदेत विविध वस्तूंवर जीएसटी लावण्याविषयी, कमी करण्याविषयी विचार विनिमय होतो. परंतू, घर भाडे आणि दुकानांवर 12 टक्के जीएसटी लावण्याविषयी सरकारने सध्या निर्णय घेतलेला नाही. मात्र सरकार याविषयीचा विचार जरुर करत आहे, त्याचा धागा पकडून काहींनी हा खोडसाळपणा केला आहे. सरकारने घरभाडे आणि दुकानांवर 12 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्याची अफवा पसरवली आहे.

सरकारचे स्पष्टीकरण

सरकारने घरभाडे आणि दुकानांवर 12 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्याच्या अफवेने देशातील घरमालकांचे धाबे दणाणले आहे. तसेच दुकानदारांना ही ताप भरला. अगोदरच महागाईने लाही लाही झाली असताना त्यावर या मॅसेजने मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे सर्वच धास्तावले. याची दखल घेत सरकराने असा कुठलाही निर्णय सरकारी स्तरावर झालेला नाही, असे स्पष्ट केले. अशाच प्रकाराचा मॅसेज पाठवून काहींनी खोडसाळपणा केल्याचे पीआयबीने स्पष्ट केले. तसेच अर्थमंत्रालय आणि जीएसटी परिषदेने याविषयीचा प्रस्ताव असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

मग जीएसटीचा नियम आहे तरी काय?

फॅक्ट चेकमध्ये हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. ही अफवा असल्याचा खुलासा दस्तुरखुद्द सरकारनेच केल्याने या अफवेवर विश्वास ठेवण्याची कुठलीच गरज उरली नाही. मात्र जीएसटी केव्हा लागतो, तेही बघणे आपल्याला गरजेचे आहे. एखादी जागा व्यावसायिक वापरासाठी दिल्यास, अशावेळी जीएसटी लागू होतो. व्यावसायिक वापरासाठी जागा देण्यात येत असेल तर अशावेळी भाड्यावर 18 टक्के जीएसटी लागू आहे आणि हा एक प्रकारे सेवा कर मानण्यात येतो.

पाहा पीआयबीचे ट्वीट

संबंधित बातम्या :

सॅनिटायझर ते कोविड औषधांवर 5% जीएसटी निश्चित, केंद्राची संसदेत माहिती

GST : महागाईत ‘जीएसटी’ ओतणार तेल ? जीएसटीवरुन राज्य आणि केंद्रात ‘महाभारत’ !

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.