Omraje Nimbalkar: ‘2029 ला मीच खासदार’ ओमराजेंचं थेट चॅलेंज’, एका मताचं गणित मांडत निकालही सांगून टाकला

धाराशिव येथे आज (२४ नोव्हेंबर २०२६) भव्य 'खासदार नोकरी महोत्सव २०२६' आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी हाच ओमराजे 2029 मध्येही निवडून येणार असं सांगत थेट चॅलेंज दिले. यावेळी त्यांनी विजयाचे प्लॅनिंग सांगत लीडही सांगितले.

Omraje Nimbalkar: 2029 ला मीच खासदार ओमराजेंचं थेट चॅलेंज, एका मताचं गणित मांडत निकालही सांगून टाकला
Image Credit source: Omraje Nimbalkar
| Updated on: Nov 24, 2026 | 3:08 PM

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी:  उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना धाराशिवसह राज्यभरातून ट्रोल केले गेले. ठाकरेंचे सर्वात निष्ठावान शिलेदार असं ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलले जायचे, मात्र त्याच ओमराजेंनी बंडखोरी केल्याने त्यांच्याविरुद्ध चौफेर टिका केली गेली. इतकेच नव्हेतर ओमराजे पुन्हा खासदार होणार नाहीत असा इशाराही धाराशिवमधीलच मतदारांनी दिला होता. मात्र आता ओमराजे निंबाळकर यांनी आपण 2029 मध्ये पुन्हा निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव येथे आज (२४ नोव्हेंबर २०२६) भव्य ‘खासदार नोकरी महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी हाच ओमराजे 2029 मध्येही निवडून येणार असं सांगत थेट चॅलेंज दिले. यावेळी त्यांनी विजयाचे प्लॅनिंग सांगत लीडही सांगितले.

Loading...

2029 ला हाच ओमराजे खासदार..!

‘2019 ला मी 1 लाख 29 हजार मतांनी निवडून आलो होतो. 2024 ला मी एकतरी मत जास्त टाका असे आवाहन केले होते आणि 3 लाख 29 हजार 846 च्या फरकाने मी निवडून आलो. आज मी तेच चॅलेंज मी स्विकारतो. मी चॅलेंज घरी बसून देत नाही. मी 24 तास माणसात बसून चॅलेंज देतो. आज तुम्हाला मी आव्हान करतो कुणी काही म्हणू द्या. 2024 ला 3 लाख 29 हजार 846 चा फरक होता. 2029 ला हाच ओमराजे 3 लाख 29 हजार 847 मतानेच निवडून येणार आहे, त्यापेक्षा कमी मताने येणार नाही. मी मत का मागतोय. तुमच्या कामाला पडत असेन तरच मत द्या, नाहीतर मत देऊ नका’, असं थेट आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.

ओमराजेंना कुणी दिलं आव्हान…! 

दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघात 2029 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय दावे प्रति दावे होऊ लागले आहेत
विद्यमान खासदार शिवसेनेचे असताना शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण 100 टक्के लोकसभा निवडणूक लढवणार असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना माजी आमदार चौगुले यांनी
एक प्रकारे राजकीय आव्हानच दिल्याचे दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us