AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीच्या महामोर्चात महापुरुषांचे पुतळे… काय आहे नियोजन?

महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करू शकणार नाहीत, असा संदेश महाविकास आघाडी देणार आहे.

महाविकास आघाडीच्या महामोर्चात महापुरुषांचे पुतळे... काय आहे नियोजन?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 17, 2022 | 11:40 AM
Share

मुंबईः शिंदे-भाजप (Shinde BJP) सरकार विरोधात महाविकास आघाडीने आज महामोर्चाचं (Mahamorcha) आयोजन केलं आहे. राज्यभरातून लाखो कार्यकर्ते आज मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईतील क्रूडास कंपनी ते टाइव्ह ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात महापुरुषांचे पुतळेदेखील असतील. चित्ररथाच्या माध्यमातून महापुरुषांच्या योगदानाचे महत्त्व समजवून सांगण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतर्फे करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे या रॅलीत सहभागी करून घेतले जात आहेत.

जे जे फ्लाय ओव्हरवरून महापुरुषांचे पुतळे असलेल्या गाड्या जातील. भाजप किंवा शिंदे सरकारच्या ज्या ज्या नेत्यांनी या महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली आहेत, त्याचा निषेध या चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करू शकणार नाहीत, असा संदेश महाविकास आघाडी देणार आहे. महामोर्चाला सुरुवात होईल, त्यावेळी या पुतळ्यांवर वाहण्यासाठी फुलांच्या पाकळ्या देखील ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबईत महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे राजकारण तापलं असतानाच भाजपतर्फेदेखील मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. हिंदू देवी देवता तसेच महापुरुषांचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांविरोधात हे आंदोलन आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध भाजपातर्फे करण्यात येतोय.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा