RSSच्या बालेकिल्ल्याला मोठं खिंडार! नागपूरमधील भाजपच्या पराभवाचे मोठे कारण आले समोर, नेमकं काय घडलं?

अभिजीत वंजारी यांचा विजय काँग्रेससाठी अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण आहे. अभिजीत वंजारी यांना प्रथम आणि द्वितीय पसंती क्रमाकांचं एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर भाजपच्या कोहळेंना 63 हजार 960 मते मिळाली आहेत.

RSSच्या बालेकिल्ल्याला मोठं खिंडार! नागपूरमधील भाजपच्या पराभवाचे मोठे कारण आले समोर, नेमकं काय घडलं?
Sudhakar kohale and CM
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 9:22 AM

नुकताच राज्यात विधानपरिषदेतील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली. सर्वात जास्त नागपूर येथील पदवीधर मतदार संघाची चर्चा रंगली. RSSचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरातील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. येथे काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. भाजपसाठी हे मोठे अपयश असल्याचे बोलले जात आहे. आता नागपूरातील पराभवाचे मोठे कारण समोर आले आहे.

रात्री नितेश कराळे यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या प्राधान्यक्रमाच्या मतांची मोजणी सुरू होताच संपूर्ण परिस्थिती पालटली. अभिजीत वंजारी यांची आघाडी झपाट्याने वाढू लागली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या सर्वांवर सुधाकर कोहळे यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “काँग्रेसने जल्लोष सुरू केला असला तरी आम्ही पराभव मान्य केलेला नाही. अजूनही ३६ वी बाद फेरी सुरू आहे. या फेरीपर्यंत मी तीन हजार मतांनी आघाडीवर आहे. भाजपाची सुमारे नऊ हजार मते बाद झाली. त्यामुळे आम्ही मागे पडलो. ज्या भाजपच्या मतदारांनी माझ्या पसंतीक्रमासमोर ‘१’ न लिहिता ‘२’ लिहिले, त्यांना मी विनंती करतो की लोकशाहीसाठी असे मतदान योग्य नाही. संपूर्ण मतमोजणी संपेपर्यंत आम्ही पराभव मान्य करणार नाही.”

Loading...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष महत्त्वाची आहे. हा भाग आरएसएसचा बालेकिल्ला मानला जातो. अशा ठिकाणी इतर कोणत्याही पक्षाचा विजय होणे हे मोठे संकेत आहेत. या मतदारसंघात पदवीधर मतदार आपल्या प्रतिनिधीची निवड करतात. त्यामुळे येथील निवडणूक केवळ राजकीय पक्षांच्या लोकप्रियतेपुरती मर्यादित न राहता, शिक्षित वर्गातील त्यांची स्वीकार्यता, स्थानिक मुद्दे आणि उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा यांचीही परीक्षा मानली जाते. येथून अभिजीत वंजारी यांचा विजय काँग्रेससाठी अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण आहे. अभिजीत वंजारी यांना प्रथम आणि द्वितीय पसंती क्रमाकांचं एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर भाजपच्या कोहळेंना 63 हजार 960 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत वंजारी यांनी 3271 इतक्या मतांनी विजय मिळवला. तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले नितेश कराळे यांना 25 हजार 908 मते पडल्याचे दिसून आलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us