Deglur Bypoll | देगलूर पोटनिवडणुकीत तिरंगी लढत, 9 उमेदवारांची माघार, कोणकोण रिंगणात?

भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. वंचितने डॉ. डॉ. उत्तमराव इंगोले यांना तिकीट दिलं आहे.

Deglur Bypoll | देगलूर पोटनिवडणुकीत तिरंगी लढत, 9 उमेदवारांची माघार, कोणकोण रिंगणात?
देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत तिरंगी लढत
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 3:07 PM

नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, तर वंचित आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत.

देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवस अखेर एकूण 23 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होते. त्यातील छाननीअंती 2 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे एकूण 21 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. 13 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

कोणकोणते उमेदवार रिंगणात

जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस), सुभाष पिराजीराव साबणे (भाजप) उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) विवेक पुंडलिकराव केररकर (जनता दल (सेक्युलर)) प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी) डी डी वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)) अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष) साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष), भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष), मारुती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष), विमल बाबुराव वाघमारे (अपक्ष), कॉ.प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष)

नांदेड बिलोलीत आता तिरंगी लढत

भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. वंचितने डॉ. डॉ. उत्तमराव इंगोले यांना तिकीट दिलं आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेणारे उमेदवार

प्रल्हाद जळबा हाटकर, धोंडीबा तुळशीराम कांबळे, सूर्यकांत माधवराव भोरगे, रामचंद्र गंगाराम भंराडे, रुमाली आनंदराव मरीबा, ॲड लक्ष्मण नागोराव देवकरे (भोसिकर) विठ्ठलराव पिराजी शाबुकसार, विश्वंभर जळबा वरवंटकर, सिद्धार्थ प्रल्हाद हाटकर या 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता निवडणूक रिंगणात 12 उमेदवार शिल्लक राहिल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी दिली.

काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना संधी

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार जितेश अंतापूरकर यांना देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

संबंधित बातम्या :

Deglur Biloli Bypoll : सेनेचा नाराज नेता भाजपचा उमेदवार, काँग्रेसचं तिकीट घरात, आता वंचितचा उमेदवार ठरला!

फडणवीसांनी नुकसानीची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला, देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.