भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळं नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसनं रावसाहेब अंतारपूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे.

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार!  पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल
ashok chavan
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 7:08 PM

नांदेड: काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळं नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसनं रावसाहेब अंतारपूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपनं शिवसेनेतील नाराज असलेले सुभाष साबणे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी दिली आहे. पोटनिवडणुकीच्या निमित्तानं मतदासंघातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते; नेहमी-नेहमी नाही, हे भाजपने लक्षात ठेवावं, असा इशारा माजी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?

काल भाजपची सभा देगलूर झाली, भाजपनं पंढरपूरची पुनरावृ्त्ती होणार, असं म्हटलं. दोस्तहो लॉटरी किती वेळा लागते, एकदाच लागते. जीवनात पुन्हा लॉटरी लावल्यास पैसे जात राहतात. पंढरपूरची लॉटरी भाजपला एकदा लागली. वारंवार ती लागणार आहे. आम्हाला काम करणाऱ्याला ताकद द्यायची आहे. भाजपसाठी पोटनिवडणूक सट्टा आहे, नांदेड जिल्हा हा सट्टाबाजार नाही. नांदेड जिल्हा हा विकासाच्या वाटेवर चालणारा, शंकरराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्याच्या विचारातून देगलूर बिलोलीची जनता जितेश अंतापूरकर यांना विजयी करेल यात शंका नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना संधी

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार जितेश अंतापूरकर यांना देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

अंतापूरकर विरुद्ध साबणे

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. त्यासाठी काँग्रेसने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. तर याच ठिकाणी पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे देखील रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये या पोट निवडणुकीच्या निमिताने दिवाळी आधीच फटाके फुटायला सुरुवात झालीय.

इतर बातम्या:

पंढरपुरातील पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत, तीन वेळा आमदार शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

Deglur – Biloli bypoll : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार?

महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील 30 विधानसभा आणि तीन लोकसभा पोटनिडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 30 ऑक्टोबरला मतदान 

Congress leader Ashok Chavan slam BJP leaders over Deglur Biloli by polls claim victory of Jitesh Antapurkar

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.