रायगडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर तटकरेंना दोन जोरदार धक्के

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारंसघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन जोरदार धक्के बसले आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश देसाई हे दोघेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये सुनील तटकरे […]

रायगडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर तटकरेंना दोन जोरदार धक्के
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:16 PM

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारंसघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन जोरदार धक्के बसले आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश देसाई हे दोघेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये सुनील तटकरे यांना शिवसेनेने कोंडीत पकडले आहे.

माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले हे राजकारणात फारसे सक्रीय नसले, तरी बॅ. ए. आर. अंतुले यांना मानणारा मोठा वर्ग रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे अंतुले कुटुंबाची राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे नविद अंतुले हे शिवसेनेत गेल्यास सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं.

दुसरीकडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, प्रकाश देसाई आता स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश देसाई यांचीही राजकीय ताकद प्रभावी आहे. त्यामुळे प्रकाश देसाई हे राष्ट्रवादीतून निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडल्यास तटकरेंना फटका बसू शकतो.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनंत गीते हे रायगडमधून लोकसभेचे उमेदवार असतील, हे जाहीर झालं नसलं तरी निश्चित आहे. मात्र, गेल्यावेळी अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले सुनील तटकरे हे यावेळी गीतेंना मोठं आव्हान निर्माण करतील, हेही निश्चित. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील प्रभावी नेते आपल्यात घेऊन, अनंत गीतेंनी सुनील तटकरेंना कोंडीत पकडण्याची तयारी केल्याचे दिसून येते आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.