Sharad Pawar: आमची अन् उद्धव ठाकरे यांची विचारधारा सारखीच, शरद पवार यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपच्या हातात कोलीत?

Sharad Pawar interview: काँग्रेस सरकारच्या काळात देशावर झालेले विविध हल्ले, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ च्या हल्ल्याबद्दल केलेला देश विरोधी दावा आणि काँग्रेसचा राम मंदिराला असलेला विरोध!, हे सर्व उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

Sharad Pawar: आमची अन् उद्धव ठाकरे यांची विचारधारा सारखीच, शरद पवार यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपच्या हातात कोलीत?
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 4:28 PM

शरद पवार यांच्या मुलाखतीने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांनी देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशी भविष्यवाणी केली आहे. तसेच आमची आणि उद्धव ठाकरे यांची विचारधारा सारखीच आहे. ते समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहे. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे, असे म्हटले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यावर महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना उबाठावर हल्ला केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटाला काही प्रश्न विचारले असून, ‘उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी’ अशी अवस्था उद्धव ठाकरे गटाची झाली असल्याचे म्हटले आहे.

सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत ठाकरे

यावेळी आमदार लाड म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेसला धरले! माझ्या तमाम हिंदू बांधवांनो … म्हणणे सोडले! काँग्रेसच्या म्हणण्यानुसार लांगूलचालन सुरु केले आहे. उबाठा गट आता कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? उद्धव ठाकरे यांची गत ‘उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी’ (अर्थ-प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो) अशी झालीय.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचा राम मंदिराला विरोध

शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार, समान विचारधारेचा छोटा प्रादेशिक पक्ष उबाठा गट पण काँग्रेसमध्ये विलीन होणार का? काँग्रेस सरकारच्या काळात देशावर झालेले विविध हल्ले, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ च्या हल्ल्याबद्दल केलेला देश विरोधी दावा आणि काँग्रेसचा राम मंदिराला असलेला विरोध!, हे सर्व उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? अशा काँग्रेसी विचारधारेला भाजपचा कायमच विरोध असेल. परंतु उद्धव ठाकरे यांना हे सर्व मान्य आहे का?” असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.

महायुतीचे समन्वयक आमदार लाड यांनी उबाठा गटाला हे प्रश्न विचारले असून, शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार समान विचारधारेचे पक्ष अथवा उद्धव ठाकरे गट यांचा उबाठा गट देखील कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? हे येणारा काळच ठरवेल!

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.