AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या बड्या नेत्याचे ‘स्टेटमेंट’

Sharad Pawar interview: काँग्रेसच्या मागे जनता उभी असल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांना फार दूरच अभ्यास असतो. त्यांना दूरदृष्टी आहे.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या बड्या नेत्याचे 'स्टेटमेंट'
शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 08, 2024 | 4:29 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असा दावा एका मुलाखतीत केला. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. शरद पवार यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) ट्वीट करत निशाणा साधला आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

काय म्हणाले नाना पटोले

शरद पवार यांच्या मुलाखतीमधील वक्तव्यानंतर नाना पटोले म्हणाले की, नुकतेच पुण्याला राहुल गांधी आले होते. त्यावेळी राहुल गांधींनी मला सांगितले की, राज्यात सर्वत्र प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट होतील ही चर्चा आहे. भाजपच्या तानाशाहीचा विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार आहेत. अनेक पक्षांनी भाजपच्या विरोधात त्यांच्या तानाशाहीच्या विरोधात मोट बांधावी, असे राहुल गांधी यांना सांगितले. त्यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्यात तथ्य आहे, असे नाना पाटोले यांनी सांगितले. गांधी परिवारच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे अटी शर्ती काही नाही. कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रा नागरिकांचा विश्वास वाढला आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणतात…

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचे आहेत. गांधी विचार कोणी संपवू शकत नाही. काही पक्ष हे अवकाळी पावसासारखे आहेत. अवकाळी पाऊस जनमाणसाला उद्धवस्थ करून जातो, तशी आताच्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. परंतु काँग्रेस हा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखा पक्ष आहे. ज्या विचारांनी हा पक्ष उभा झालेला आहे.

राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत विकास हा अजेंडा राहिलेला आहे. आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. जनता पूर्ण देश बदलण्याची तयारी करून बसलेली आहे. काँग्रेसच्या मागे जनता उभी असल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांना फार दूरच अभ्यास असतो. त्यांना दूरदृष्टी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

शरद पवारांचा जन्मच काँग्रेस आहे, गांधी विचारधार आहे. ते तालमीतच तयार झाले आहेतृ. यशवंतराव चव्हाण पासून त्यांच्या कारकीर्दी सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल, असे वाटणे स्वाभाविक आहे,असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा