AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापलेली फळे गलेच पडत आहेत काळी, फळे ताजी ठेवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डॉक्टर कायम फळे खाण्याचा सल्ला देत असतात. पण आता ऑफिसला किंवा दुसरीकडे कुठे जायचं असेल तर, फळे बरोबर घेताना एक प्रश्न उपस्थित राहतो आणि तो म्हणजे फळे कापल्यानंतर लगेच काळी पडतात... तर फळे जाती ठेवण्यासाठी 5 घरगुती उपाय

कापलेली फळे गलेच पडत आहेत काळी, फळे ताजी ठेवण्यासाठी 5 घरगुती उपाय
| Updated on: Jul 26, 2026 | 4:21 PM
Share

कापल्यानंतर काही मिनिटांतच फळांचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. ज्यामुळे ती फळे खाण्या ऐवजी फेकली जातात. सफरचंद, केळी, नाशपाती किंवा अ‍ॅव्होकॅडो… यांसारखी फळे रोजच्या आहारात आवश्यक असतात. पण बऱ्याच लोकांना एका सामान्य समस्येचा सामना करावा लागतो. फळे कापल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. विशेषतः जर ती थोडा वेळ उघडी ठेवली किंवा डब्यात ठेवली, तर ती ताजी दिसत नाहीत. परिणामी, बरेच लोक फळ खराब झाले आहे असे समजून ते फेकून देतात.

मात्र, वैद्यकीय आणि अन्न तज्ञांच्या मते, रंग बदलला म्हणजे फळ खराब झाले असे होत नाही. कापल्यानंतर, जेव्हा फळ हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येते, तेव्हा त्यातील एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियेमुळे त्याचा रंग बदलू लागतो. यासोबतच, उष्ण हवामान आणि अयोग्य साठवणूक ही समस्या आणखी वाढवतात. थोडी काळजी घेतल्यास आणि काही सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यास, कापलेली फळे दीर्घकाळ ताजी ठेवणे शक्य आहे.

कापलेल्या सफरचंद, केळी किंवा नाशपातीवर थोडा लिंबाचा रस शिंपडा. लिंबामधील व्हिटॅमिन सी किंवा एस्कॉर्बिक ॲसिड, फळांमधील एन्झाइम्सना हवेच्या संपर्कात आल्यावर रंग बदलण्यापासून रोखते. तथापि, जास्त लिंबाचा रस वापरू नये याची काळजी घ्या, कारण यामुळे फळांची मूळ चव बिघडू शकते. कापलेली फळे डब्यात कधीही उघडी ठेवू नका. कापल्यानंतर लगेचच ती हवाबंद डब्यात ठेवा. हवेच्या संपर्कात जेवढा कमी येईल, तेवढी फळे कमी काळी पडतील.

फळे जास्त काळ खोलीच्या तापमानात ठेवणे कधीही योग्य नाही. जर तुम्ही ते लगेच खाणार नसाल, तर ते रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा. थंड तापमान एन्झाइमची प्रक्रिया मंदावते आणि फळांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. गरजेनुसार फळे कापा: फळे अगोदर कापून ठेवणे टाळा. जेव्हा गरज असेल तेव्हाच, जेवढी फळे लागतील तेवढी कापा. यामुळे फळांचे पौष्टिक मूल्य, चव आणि नैसर्गिक रंग टिकून राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, फळे कापण्यासाठी नेहमी स्वच्छ, कोरडी भांडी, धारदार चाकू आणि स्वच्छ कटिंग बोर्ड वापरा. ​​फळे फ्रिजमध्ये जास्त काळ साठवून ठेवू नका.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच