शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होणार?; देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान काय?

भारताला कोण सुरक्षित ठेवू शकतो? आज पाकिस्तान आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. आपल्या देशात 2014 नंतर बॉम्बस्फोट करण्याची पाकिस्तानची हिम्मत झाली नाही. त्यांनी बॉम्बस्फोट घडवला तर त्यांची परिस्थिती काय होईल? केवळ मोदींचं नेतृत्व असल्यामुळेच आपला देश सुरक्षित आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होणार?; देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान काय?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 1:05 PM

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा केला आहे. तसेच त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलिन करायचा की नाही याचा निर्णय निवडणुकीनंतरच घेऊ असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होऊ शकतो हेच फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना असं जर म्हणायचं असेल तर त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्या डोक्यात असेल तर तो काँग्रेसमध्ये विलीन करावा. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी संकेत दिले आहेत. त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार त्यांचा पक्ष विलीन काँग्रेसमध्ये करतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस आज धुळ्यात आहेत.

आठही जागा जिंकू

उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला प्रतिसाद मिळत आहे. आमच्यासाठी वातावरण अनुकूल आहे. आम्ही आठही जागा चांगल्या फरकाने जिंकणार आहोत. नंदुरबारमध्ये हिना गावित रेकॉर्ड मताने जिंकतील. धुळ्याला देखील सुभाष भामरे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ठाकरेंच्या काळात मराठी माणूस निर्वासित

मराठी माणसाला जॉब नाकारला जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पहिली गोष्ट अशी मराठी माणसाचे ठेकेदार कोण आहेत? ते म्हणजे मराठी नाही. आम्ही देखील मराठीच आहोत. मराठी माणसांचा पक्ष आमच्या सोबत आहे. मुंबईतील मराठी माणसाला कोणी जर निर्वासित केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झाले आहेत, असा हल्लाच त्यांनी चढवला.

मोदींमुळे लोन मिळाले

आज मोदींनी मुद्रा सारखी योजना आणली. बिना गॅरेंटी, बिना तारण लोन मिळाले. मोदींनी सगळ्या लोकांची गॅरंटी घेतली आणि 60 कोटीपेक्षा जास्त लोकांना लोन मिळाले. देशात बचत गट तयार केले. त्याला 8 लाख कोटी दिले. मोदी म्हणतात पुरुष पायावर उभे राहतो, तेव्हा एक केवळ पुरुष पायावर उभे राहतात. एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण कुटुंब उभे राहते, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.