AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guess Who: स्वतःच्या मृत्यूचं नाटक करणारी अभिनेत्री… क्रिकेट वर्ल्ड कप, न्यूड फोटोशूट आणि…, आज कसं जगतेय आयुष्य…

Guess Who: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी प्रसिद्धीसाठी सर्व मर्यादा ओलांडल्या... अशाच एका अभिनेत्रीने स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलं... भारत क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर केलेली वादग्रस्त योजना... आज कसं आयुष्या जगतेय अभिनेत्री...

Guess Who: स्वतःच्या मृत्यूचं नाटक करणारी अभिनेत्री... क्रिकेट वर्ल्ड कप, न्यूड फोटोशूट आणि...,  आज कसं जगतेय आयुष्य...
| Updated on: Mar 11, 2026 | 11:14 AM
Share

Guess Who: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री पदार्पण करतात, पण सगळ्याच अभिनेत्रींना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत नाही. अशात मोठ्या पडद्यावर यश न मिळाल्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे लागतात. तेव्हा अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलं. ज्यामुळे चाहत्यांना मोठा फटका बसलेला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री पूनम पांडे आहे… पूनम कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते..

पूनम पांडे हिचं पहिल्यांदा नाव चर्चेत आलं जेव्हा, तिने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिने क्रिकेटबद्दल एक विधान केलं ज्याने देशाचं लक्ष वेधून घेतलं. जर भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला तर ती न्यूड फोटोशूट करेल असं तिने जाहीर केलेलं. या विधानामुळे ती रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. असं काही झालं नसलं तरी, त्यानंतर तिच्या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

सिनेमांत नाही मिळालं यश

पूनम हिने अनेक शो आणि सिनेमांच्या माध्यमातून रिऍलिटी शोमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला. ‘नशा’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पण तिला अधिक यश मिळालं नाही… पण सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली… पूनम हिने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना थक्क केलं आहे…

स्वतःच्या निधनाची अफवा…

पूनम कायम तिच्या वादग्रस्त कारणामुळे चर्चेत राहिली. पण तिने स्वतःच्या मृत्यूचं नाटक रचलं. काही महिन्यांपूर्वी, सोशल मीडियावर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बातमी समोर आली की, सर्व्हायकल कॅन्सरमुळे अभिनेत्रीचं निधन झालं. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा फटका बसला… पण, दुसऱ्याच दिवशी पूनम पांडे स्वतः पुढे आली आणि म्हणाली की हे सर्व सर्व्हायकल कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे.

या घटनेनंतर पूनम हिला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी म्हटलं की, स्वतःच्या मृत्यूचं नाटक करणं हा जागरूकता पसरवण्याचा योग्य मार्ग नाही, तर काहींनी तिचे हे पाऊल लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. पूनम कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा