AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : जेव्हा खासदार नवनीत राणा चुलीवर भाकरी थापतात! पाहा व्हिडीओ

शनिवार आणि रविवारी त्या आपल्या मतदारसंघातील अंजनगाव बारी इथं आपल्या शेतातील घरात मुक्कामी होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना आणि मुलाबाळांना स्वत:च्या हाताने घरातील चुलीवर भाकरी थापून आणि पोळ्या करुन खाऊ घातल्या.

Navneet Rana : जेव्हा खासदार नवनीत राणा चुलीवर भाकरी थापतात! पाहा व्हिडीओ
खासदार नवनीत राणा यांचा चुलीवर स्वयपाक करतानाचा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 6:53 PM
Share

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या तुम्हाला कधी एखाद्या आंदोलनात घोषणाबाजी करताना पाहिलं असेल. खासदार झाल्यानंतर संसदेत आपल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करताना पाहिलं असेल. कधी संसदेतून महाराष्ट्र सरकारवर हल्ला चढवताना, तर कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना पाहिलं असेल. सध्यस्थितीत पूरग्रस्त भागाचा दौरा करतानाही नवनीत राणा पाहायला मिळाल्या. मात्र, आता नवनीत राणा एका वेगळ्या आणि खास भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या चुलीवर भाकरी थापताना आणि पोळ्या करताना दिसून येत आहेत. (Video of Amravati MP Navneet Rana making bread on the stove goes viral)

संसद अधिवेशनाच्या काळात नवनीत राणा राजधानी दिल्लीत लोकसभेत प्रश्न उपस्थित करताना दिसून आल्या. तर शनिवार आणि रविवारी त्या आपल्या मतदारसंघातील अंजनगाव बारी इथं आपल्या शेतातील घरात मुक्कामी होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना आणि मुलाबाळांना स्वत:च्या हाताने घरातील चुलीवर भाकरी थापून आणि पोळ्या करुन खाऊ घातल्या. भाकरी थापताना आणि पोळ्या करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. राणांचा हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीलाही उतरत आहे.

‘आवडीने भाकरी बनवायला शिकले’

आपल्या सासूबाई आणि आई दोघीही हातावरील भाकरी बनवतात. मात्र, लग्नाच्या आधी अशा भाकऱ्या कधी बनवल्या नाहीत. मात्र, लग्नानंतर कुटुंबाची ओढ लागली आहे. कुटुंबाला आणि मुलांना आपल्या हाताने काहीतरी बनवून खाऊ घालावं वाटतं. म्हणून कामातून वेळ काढून सासूबाईंकडून भाकऱ्या बनवायला शिकले. आमदार रवी राणा यांनाही चुलीवरच्या भाकरी आवडतात. त्यामुळे अजूनच आवडीने मी भाकरी करते, असं सांगायलाही नवनीत राणा विसरल्या नाहीत.

इतर बातम्या :

‘फुकट बिर्याणी’ फुकटातच मिळणार की महागात पडणार? ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन अद्याप कारवाईला सुरुवातच नाही!

Video : शिवसैनिकांनी ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड फोडला, आता अदानी कंपनीकडून स्पष्टीकरण!

Video of Amravati MP Navneet Rana making bread on the stove goes viral

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.