सांगली-कोल्हापुरात मुख्यमंत्री म्हणाले, कठोर निर्णय घ्यावेच लागतील, उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 02, 2021 | 2:21 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरपाठोपाठ आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. दोन्ही दौऱ्यात त्यांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं सांगितलं. (strict decision has to be taken to prevent flood situation: cm uddhav thackeray)

सांगली-कोल्हापुरात मुख्यमंत्री म्हणाले, कठोर निर्णय घ्यावेच लागतील, उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरपाठोपाठ आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. दोन्ही दौऱ्यात त्यांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं सांगितलं. शहर असो वा गाव… ज्या ठिकाणी पूर येण्याची आणि दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणच्या वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. त्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. (strict decision has to be taken to prevent flood situation: cm uddhav thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगलीतील विविध गावांमध्ये जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. नंतर त्यांनी प्रशासनाकडून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरस्थितीची माहिती दिली. आपत्तीची वारंवारिता वाढली आहे. काही दिवसांचा पाऊस काही तासात पडतोय. दरडी कोसळत आहेत. रस्ते खचत आहेत. तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना घडली. निसर्गासमोर आपण हतबल असतो. नदीपात्रात पूररेषा, रेड लाईन, ब्लू लाईन वगैरे आहेत. त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. त्या ठिकाणी अतिक्रमण होता कामा नये, असं सांगतानाच काही ठिकाणी वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. शहर आणि गावातील वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. पाण्याला अडथळा असणारी बांधकामं दूर करावी लागणार आहेत. ते नाही केलं तर पूर संकटातून आपण कधीच बाहेर पडणार नाही. त्यासाठी तुमचं सहकार्य हवं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कठोर निर्णय घ्यावा लागेल

आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणे हे काम सुरु झालं आहे. महापुराचं संकट वाढत आहे. घरांचं नुकसान, दुकानांचं नुकसान, वाहून गेलेले रस्ते, पूल, अशी कामं करण्याची गरज आहे. तसं यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल. त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

घोषणांनी पोट भरणार नाही

पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लड मॅनेजमेंट करावं लागेल. नद्या फुगतात ते पाणी वळवावं लागेल. काही लोकांनी सूचना केल्या आहेत. हे पाणी दुष्काळी भागात वळवण्याच्या सूचना आल्या आहेत. तसं होत असेल तर सोन्याहून पिवळं. पुराच्या पाण्याचं नियंत्रण आणि भूगर्भाचा अभ्यास करावा लागेल त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. विकास कामे केली पाहिजेतच, त्यानंतर होणारा फायदा आणि होणारा तोटा याचा विचार करावा लागेल. भविष्यातील दुष्परिणामाचा विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. नुसतं घोषणा करण्याने कुणाचं पोट भरणार नाही. काम केल्याने प्रश्न मार्गी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्राकडून अपेक्षा

केंद्र सरकारकडून दोन-तीन गोष्टींची अपेक्षा आहे. त्यांनी एनडीआरएफचे निकष बदलावे, महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून व्यापाऱ्यांना तात्काळ 50 हजाराची आर्थिक मदत द्यावी, आदी केंद्राकडून अपेक्षा आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (strict decision has to be taken to prevent flood situation: cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

कोल्हापुरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटले, सांगलीत मात्र दोघांचे कार्यकर्ते भिडले

LIVE : मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने

चिपळूणकरांच्या खात्यात अजूनही 10 हजार रुपये जमा नाही, सामंत म्हणतात, मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार

(strict decision has to be taken to prevent flood situation: cm uddhav thackeray)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI