चिपळूणकरांच्या खात्यात अजूनही 10 हजार रुपये जमा नाही, सामंत म्हणतात, मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार

राज्य सरकारने पूरग्रस्तांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली. या घोषणेला चार दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही चिपळूणकरांच्या खात्यात दहा हजार रुपयांची रक्कम आली नाही. (uday samant)

चिपळूणकरांच्या खात्यात अजूनही 10 हजार रुपये जमा नाही, सामंत म्हणतात, मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार
Uday Samant

चिपळूण: राज्य सरकारने पूरग्रस्तांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली. या घोषणेला चार दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही चिपळूणकरांच्या खात्यात दहा हजार रुपयांची रक्कम आली नाही. त्यामुळे चिपळूणकरांमध्ये संतापाची भावना आहे. तर, चिपळूणकरांच्या खात्यात उद्या मंगळवारी पाच हजार रुपये जमा होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. (5 thousand rupees for emergency relief flood affected people will get tomorrow)

उदय सामंत यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. चिपळूणमधील बाधितांना तातडीची मदत म्हणून 10 हजारापैकी 5 हजार उद्यापासून खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना सरकारकडून हा तात्पुरता दिलासा दिला जात आहे. सरकार लवकरच सर्व आढावा घेऊन पॅकेजची माहिती घेणार आहे, असं सामंत यांनी सांगितलं.

टिळक स्मारकाला 50 लाख

चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालयाला मंत्री उदय सामंत यांनी 50 लाखांचा निधीही जाहीर केला. चिपळूण आणि रत्नागिरीमधील बाधित ग्रंथालयांनाही तातडीची 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांनी श्रेयवाद करू नये. श्रेयवाद करणाऱ्यांना जनता सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेना भवन हे तर मंदिर

दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याचं विधान केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना भवन फोडू असं बोलून त्यांनी त्यांची वैचारिक दिवाळखोरी सिद्ध केली आहे. सेनाभवन हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं मंदिर आहे. मंदिरावर दगड फेकण्याची भाषा करणाऱ्यांना जनता उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. (5 thousand rupees for emergency relief flood affected people will get tomorrow)

 

संबंधित बातम्या:

पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत, विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा

महाडमध्येच एनडीआरएफचं बेस कॅम्प का?; आदिती तटकरे यांनी सांगितलं कारण!

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात

(5 thousand rupees for emergency relief flood affected people will get tomorrow)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI