AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’; मलिक यांचा दुबईतून मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब’

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?'; मलिक यांचा दुबईतून मध्यरात्री 'फोटोबॉम्ब'
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 8:24 AM
Share

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक सातत्याने करत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत.

कबूल है, कबूल है, कबूल है…

हा फोटो पोस्ट करतानाच मलिक यांनी ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देखील दिले आहे. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांनी याबाबत अनेकदा पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे देखील सादर केले आहेत. आज पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ‘फोटोबॉम्ब’ फोडला आहे. त्यांनी वानखेडे यांचा ट्वटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. या फोटोमुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

निलोफर यांनी पोस्ट केला विवाहाचा दाखला

दरम्यान मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी देखील काल वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी हा फोटो पोस्ट कोला आहे.

संबंधित बातम्या

भर पावसात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; काहीही झाले तरी मागे हटणार नसल्याचा निर्धार

महापालिका शाळा सुरु करण्यास अनुकूल; मात्र लसीकरणाशिवाय पहिली ते पाचवीची शाळा नको, टास्क फोर्सचा आग्रह

मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.