महापालिका शाळा सुरु करण्यास अनुकूल; मात्र लसीकरणाशिवाय पहिली ते पाचवीची शाळा नको, टास्क फोर्सचा आग्रह

लसीकरण झालेली मुलं शाळेत यायला हवीत. केंद्र सरकरने आता लवकरात लवकर लहान मुलांचं लसीकरण सुरू करावं, असं मत डॉ. ओक यांनी व्यक्त केलं.

महापालिका शाळा सुरु करण्यास अनुकूल; मात्र लसीकरणाशिवाय पहिली ते पाचवीची शाळा नको, टास्क फोर्सचा आग्रह
महापालिका शाळा सुरु करण्यास अनुकूल, मात्र लसीकरणाशिवाय पहिली ते पाचवीची शाळा नको
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 9:47 PM

मुंबई : पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु करण्यास टास्क फोर्स अनुकूल नाही. लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करणं योग्य होणार नाही, असं मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केलंय. शिक्षण विभाग पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू करण्यास अनुकूल असलं तरी टास्क फोर्सनं मात्र विरोध केलाय. मुलं कोविडला बळी पडणार नाहीत याची काळजी अधिक असल्याचं डॉ. ओक यांनी सांगितलं.

लसीकरण झालेली मुलं शाळेत यायला हवीत. केंद्र सरकरने आता लवकरात लवकर लहान मुलांचं लसीकरण सुरू करावं, असं मत डॉ. ओक यांनी व्यक्त केलं. मास्क ही पहिली लस आहे. मात्र सणासुदीच्या दिवसात लोकांनी मास्क टाळला. यामुळेच तिसरी लाट येणार नाही असं म्हणता येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

अमेरिकेतील परिस्थिती महाराष्ट्रात येऊ द्यायची नाही

शाळा सुरू करायला मला भीती वाटेल. हायब्रीड शाळा हे त्यावरचं उत्तर आहे. तिसऱ्या लाटेचं भूत आता मानेवरुन उतरवायचं का याबाबत गेल्या सोमवारी चर्चा झाली पण आम्ही ह्याला तयार नाही. तिसऱ्या लाटेचा अंदाज चुकल्याचा आनंद मला आहे. अमेरिकेत मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण इतकं वाढले की मुलांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट केले जात आहे. ही परिस्थिती मला माझ्या राज्यात येऊ द्यायची नाही, असेही टास्क फोर्सने स्पष्ट केले.

मुंबईत लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिबॉडिज आढळले आहेत. जी परिस्थिती एप्रिल 2021 होती. आता टीव्हायरल औषध आहेत, मोनोक्लोमल अँटीबॉडीज आहेत. भारताने सगळ्यात आधी डेल्टा व्हेरिएंटचा सामना केला. मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो नाही, पण त्यांच्या डॉक्टरांशी बोललो. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याची मुदत राज्य सरकारने दिली आहे.

शाळा सुरु करण्यास महापालिका अनुकूल

शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी प्रशासन पूर्ण सक्षम आहे असे महापालिकेनं कळवलंय. अनलॉकनंतर, सार्वजनिक ठिकाणी गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील कोविड केसेस नगण्य आहेत. त्यामुळे, बगिचे, क्रिडांगणे, बाजार याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असताना शाळा सुरु करण्यास हरकत नाही असे महापालिकेचे मत आहे. मात्र कोविड टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार लहान मुलांचे लसीकरण सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा आग्रह आहे. अनेक महिने लहान मुले शाळेत गेलेली नाहीत, त्यामुळे पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा सल्ला टास्क फोर्सने दिलाय. (Task Force urges not to start 1st to 5th school without vaccination)

इतर बातम्या

मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

दिल्लीत विलीनीकरण झालं, महाराष्ट्रात का नाही? आम आदमी पार्टीचा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सवाल

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.