विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीला 50 जागाही मिळणार नाहीत : गिरीश महाजन

| Updated on: May 21, 2019 | 5:49 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. दुष्काळाचा आढावा आणि निवडणूक या विषयावर भाजपची मुंबईत बैठक झाली. यामध्ये आमदार, पालकमंत्री आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. दुष्काळासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शिवाय या विधानसभेची भाजपने तयारी सुरु केली असल्याचंही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यावेळी 50 […]

विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीला 50 जागाही मिळणार नाहीत : गिरीश महाजन
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. दुष्काळाचा आढावा आणि निवडणूक या विषयावर भाजपची मुंबईत बैठक झाली. यामध्ये आमदार, पालकमंत्री आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. दुष्काळासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शिवाय या विधानसभेची भाजपने तयारी सुरु केली असल्याचंही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यावेळी 50 जागाही मिळणार नाहीत, असं ते म्हणाले.

भाजपची निवडणूक लढण्यासाठी कधीही तयारी असते. एका विधानसभा मतदारसंघात 10 हजार कार्यकर्त्यांची टीम तयार आहे. प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी 50 चा आकडाही गाठू शकणार नाही अशी परिस्थिती त्यांची आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेलाही गिरीश महाजनांनी उत्तर दिलं. तुमच्या पक्षाचे चार खासदार कसे निवडून येतील यावर काम केलं असतं तर बरं झालं असतं. पवार वैफल्यग्रस्त परिस्थितीत आहेत. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हवेचा रोख ओळखलाय. त्यामुळे ते विविध कारणं शोधत आहेत. ते जर पंतप्रधान होत असतील आणि त्यांचे जास्त लोक निवडून येत असतील तर त्यांना शुभेच्छा, असं गिरीश महाजन म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत गिरीश महाजनांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंना भाजपात आणणे, माढ्यात रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश यासह अनेक नेत्यांना त्यांनी भाजपच्या गळाला लावलं होतं. विधानसभेसाठी आता गिरीश महाजन पुन्हा सक्रिय झाले आहेत. यावेळीही पक्षाकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा 2014 चा निकाल

विधानसभेच्या 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 122 जागा जिंकल्या होत्या. तर 63 जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेसने 42 आणि राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या होत्या. बहुजन विकास आघाडी 03, शेकाप 03, एमआयएम 02, सीपीआयएम 01, मनसे 01, रासप 01, सपा 01 आणि इतरांनी दोन जागा जिंकल्या होत्या.

या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. तरीही दोन्ही पक्षांनी भरघोस मते घेतली होती. भाजपने 27.80 टक्के, तर शिवसेनेने 19.30 टक्के मते घेतली. भाजपने 260 जागा लढल्या होत्या, ज्यापैकी 122 जागा जिंकल्या. उर्वरित जागा भाजपने मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. शिवसेनेने सर्वच्या सर्व 288 जागा लढत 63 जागांवर विजय मिळवला होता.