AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजप आणि महाविकासआघाडी अशा दोन्ही बाजुंनी मुक्ताईनगरमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. | gram panchyat election results 2021

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं पहिलं ट्विट, म्हणाले...
एकनाथ खडसे
| Updated on: Jan 19, 2021 | 12:37 PM
Share

मुंबई: भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर मोघम का होईना पण भाष्य केले आहे. त्यांनी मंगळवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील 71 ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat results) विजय मिळाल्या दावा केला आहे. तसेच त्यांनी विजयी शिलेदारांचे अभिनंदनही केले आहे. (NCP Leader Eknath Khadse reaction on panchyat election results 2021)

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजप आणि महाविकासआघाडी अशा दोन्ही बाजुंनी मुक्ताईनगरमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ खडसे यांनी सून रक्षा खडसे यांनीही सोमवारी कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले होते. कोथळी गावात भाजपचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी विजयी झालेले उमेदवार नाथाभाऊंना मानणारे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी ट्विट करुन मुक्ताईनगरमध्ये महाविकासआघाडीला 71 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाल्याचे सांगत मोठ्या विजयाचा दावा केला आहे.

‘ना भाजप ना राष्ट्रवादी आम्ही फक्त खडसे परिवाराचे’

मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालामुळे मोठं संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. ग्रामपंचायत एकूण अकरा जागांची होती. यामध्ये दोन जागा बिनविरोध होत्ता. त्यामुळे नऊपैकी 5 याठिकाणी शिवसेनेनं विजय मिळवला तर सहा उमेदवार आम्ही ना राष्ट्रवादीचे ना भाजपचे आम्ही खडसे परिवाराचे असल्याचं त्यांनी म्हटल्यानं याठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : जळगावात महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ

भाजपने 6 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या; केशव उपाध्ये यांचा दावा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा

(NCP Leader Eknath Khadse reaction on panchyat election results 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.