देशात नक्कीच परिवर्तन होईल; शरद पवारांचं दिल्लीतून मोठं विधान

| Updated on: Sep 11, 2022 | 2:03 PM

शेजारील देशात हुकुमशाहीला जनतेने विरोध केला. काही लोकांच्या हातात सत्ता गेल्यामुळे असे घडले. देशात शेतकऱ्यांवर गाड्या घातल्या. ते योग्य नाही. आपल्या देशात 56 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचा अभिमान आहे.

देशात नक्कीच परिवर्तन होईल; शरद पवारांचं दिल्लीतून मोठं विधान
देशात नक्कीच परिवर्तन होईल; शरद पवारांचं दिल्लीतून मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: येत्या 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या पक्षाची बांधणी सुरू केलेली असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे सुद्धा कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची मोट बांधायचं काम सुरू केलेलं असतानाच आता त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचं (ncp) जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप (bjp) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच देशात नक्कीच परिवर्तन होईल, असा विश्वासही बोलून दाखवला. याशिवाय देशातील निष्क्रिय सरकारच्या विरोधात सर्वांनी आवाज उठवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी हा विश्वास व्यक्त केला. सरकारच्या निष्क्रियतेविषयी आवाज उचलला पाहिजे. सरकारला आपल्या एकतेची ताकद दाखवली पाहिजे. यासाठी देशाने एकत्र येण्याची गरज आहे. देशात ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. त्याविरोधात लढण्याची तयारी सर्वांनी ठेवली पाहिजे. देशात नक्कीच परिवर्तन होईल, असं शरद पवार म्हणाले.

पंतप्रधानांकडून दिशाभूल

धर्म ही अफूची गोळी आहे. या पासून सावध राहायला हवं, असंही शरद पवार म्हणाले. भारत आणि चीन सीमेवरील पेट्रोलिंग पॉइंटवर चीनने नियंत्रण मिळवलं आहे. आपल्या देशात कोणी घुसलं नाही असं देशांच्या पंतप्रधानांनी सांगितलं. मात्र, पंतप्रधानांनी देशाचं घुमजाव केलं. एप्रिल 2020 ला जशी स्थिती आहे. तशी स्थिती सध्या सीमेवर नाही, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दिल्लीसमोर झुकू नका

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. दिल्लीसमोर झुकू नका ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे. शिवाजी महाराज दिल्लीच्या गझनी पुढे झुकले नाहीत. आजही त्याच दिल्लीत आम्ही एकत्र आलोय. तालकटोरा मैदानाला इतिहास आहे, सदाशिवराव पेशवे यांचा तळ याच तालकटोरामध्ये होता, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपकडून शेतकऱ्यांचा विरोध

शेजारील देशात हुकुमशाहीला जनतेने विरोध केला. काही लोकांच्या हातात सत्ता गेल्यामुळे असे घडले. देशात शेतकऱ्यांवर गाड्या घातल्या. ते योग्य नाही. आपल्या देशात 56 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचा अभिमान आहे. भाजप सरकारने शेतकरी आंदोलनाचा विरोध केला. पण आमचा पक्ष त्यांच्यासोबत राहिला. जगाने दिल्लीच्या सीमेवरील शांततेत झालेलं आंदोलन पाहिलं. पण सरकारने तिन्ही कृषी कायद्यांवर संसदेत चर्चाच घडवून आणली नाही, असं ते म्हणाले.

समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न

काही लोकं शपथ घेतल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्या उपस्थित करतात. अल्पसंख्याकांवर अन्याय करतात. काही लोक समाजात दुफळी निर्माण करत आहेत. हा मोठा धोका आहे. असे वाद निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी देशाला संबोधित केले. महिलांच्या संरक्षणावर ते बोलले. परंतु, दुसऱ्याच दिवशी त्यांच्याच गुजरातमध्ये गुजरात दंगलीत ज्या महिलेवर अन्याय झाला होता. त्या महिलेच्या आरोपींना सोडून देण्यात आले. गुजरातमधील भाजप सरकारने या आरोपींची शिक्षा माफ केली, असं ते म्हणाले.