AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायबद्दलची ही गोष्ट 99 टक्के लोकांना माहिती नाही, ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

सौंदर्य आणि अभिनय तर आहेच, पण बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची या गोष्टीमध्ये देखील आहे खूपच हुशार. ऐकून तुम्हाला देखील बसणार नाही विश्वास.

ऐश्वर्या रायबद्दलची ही गोष्ट 99 टक्के लोकांना माहिती नाही, ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 02, 2026 | 5:48 PM
Share

Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूडची ग्लॅमर क्वीन म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमीच तिच्या उत्कृष्ट अभिनय, सौंदर्य आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असते. मात्र एका जुन्या चॅट शोमध्ये तिने आपल्या लपलेल्या प्रतिभेचा असा खुलासा केला ज्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला. या वेळी प्रेक्षकांनी केवळ तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या मधुर आवाजाचेही भरभरून कौतुक केले.

लोकप्रिय चॅट शो ‘जीना इसी का नाम है’ च्या एका विशेष भागात ऐश्वर्या राय अभिनेता चंद्रचूड़ सिंह यांच्यासोबत सहभागी झाली होती. या एपिसोडमध्ये शोचे होस्ट फारूक शेख यांच्यासोबत तिने हलक्या-फुलक्या गप्पा मारत खुसखुशीत वातावरण निर्माण केले. शोदरम्यान फारूक शेख यांनी चंद्रचूड़ सिंह यांना ‘जोश’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एखादा मजेशीर किंवा खास किस्सा सांगण्यास सांगितले. याचवेळी चंद्रचूड़ यांनी एक असा खुलासा केला जो अनेकांसाठी अनपेक्षित होता.

चंद्रचूड़ सिंह यांनी सांगितले की, ऐश्वर्या राय गायनातही अतिशय उत्तम आहे, मात्र ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती आहे. ते म्हणाले, ‘ऐश्वर्या जितकी सुंदर दिसते, त्याहूनही सुंदर तिची गायनशैली आहे. तिचा आवाज अत्यंत मधुर आहे.’ या खुलाशानंतर स्टुडिओतील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आणि सर्वांनी ऐश्वर्याला गाण्याची विनंती केली.

यावर ऐश्वर्या हसत म्हणाली की, खरं तर गाणं चंद्रचूड़च खूप छान गातात. मात्र प्रेक्षकांच्या आग्रहामुळे आणि फारूक शेख यांच्या विनंतीवरून ऐश्वर्याने अखेर गायन करण्यास सुरुवात केली. तिने आपल्या बॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘और प्यार हो गया’ मधील लोकप्रिय गाणं ‘मेरी साँसों में बसा है तेरा ही एक नाम’ अतिशय भावपूर्ण आणि सुंदर पद्धतीने गायले.

ऐश्वर्याच्या मधुर आवाजाने उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. या गाण्यात तिला चंद्रचूड़ सिंह यांचीही सुरेल साथ लाभली. हा क्षण शोमधील सर्वात लक्षवेधी ठरला आणि आजही सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो.

एपिसोडदरम्यान फारूक शेख यांनी चंद्रचूड़ सिंह यांना ऐश्वर्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारले. यावर चंद्रचूड़ यांनी मनमोकळेपणाने तिची प्रशंसा करत म्हटले, ‘ती अतिशय दयाळू आणि सहकार्य करणारी अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी मोठे सौभाग्य होते. मी तिच्याकडून खूप काही शिकलो आहे. ती केवळ सुंदरच नाही, तर अत्यंत समजूतदार असल्याचं त्यांनी म्हटलं.

Follow Us
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग
हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप
Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर
एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं
Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ