AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदान म्हणजे पागलपण, 80 वर्षांच्या आयुष्यात कधीच…माजी न्यायाधिशांचं मोठं वक्तव्य!

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपण आयुष्यात कधीही मतदान केले नसल्याचा दावा करत त्यांनी भारतासाठी आधुनिक विचारसरणीच्या हुकूमशहाची गरज असल्याचे मत मांडले. त्यांच्या या विधानांमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मतदान म्हणजे पागलपण, 80 वर्षांच्या आयुष्यात कधीच...माजी न्यायाधिशांचं मोठं वक्तव्य!
Former SC JudgeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 04, 2026 | 9:17 PM
Share

स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर आणि निवडणूक प्रणालीवर जोरदार हल्ला चढवला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते निवडणूक राजकारण आणि मतदान प्रक्रियेला पूर्णपणे निरर्थक मानतात एवढंच नाही तर त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही मतदान केलेले नाही. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले काटजू?

मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही मतदान केले नाही आणि कधी करणारही नाही. मी या वेडात कधीही सहभागी होणार नाही. मतदान केंद्रावर जाऊन मत देण्यात काहीच अर्थ नाही. गेल्या महिन्यातच मी ८० वर्षांचा झालो, अंस सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू त्यांच्या मुलाखतीत म्हणाले आहेत. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान न्यायमूर्ती काटजू यांनी निवडणूक प्रणाली, न्यायपालिका आणि देशात सुरू असलेल्या अलीकडील राजकीय घडामोडींवर आपले विचार व्यक्त केले.

यावेळी माजी न्यायाधीश काटजू म्हणाले की, भारतासारख्या देशासाठी लोकशाही व्यवस्था व्यावहारिकदृष्ट्या अयशस्वी ठरली आहे. त्यांनी असाही आरोप केला की, देशातील ९० ते ९५ टक्के लोकसंख्या मतदान करताना उमेदवाराची क्षमता, प्रामाणिकपणा किंवा शिक्षण पाहत नाही, तर केवळ जात आणि धर्माच्या आधारावर मेंढ्या-बकऱ्यांप्रमाणे मतदान करते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ज्या समाजात लोकांची विचारसरणी आधुनिक आणि विवेकपूर्ण असते, तिथेच लोकशाही वैध ठरू शकते. जोपर्यंत देशातून जातीयवाद आणि सांप्रदायिकता समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत निवडणुकांना कोणताही अर्थ उरत नाही.

मतचोरीवर मांडलं मत

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आणि कथित ‘मतचोरी’च्या आरोपांविरोधात विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर न्यायमूर्ती काटजू यांनी टोला लगावलाय,  काटजू म्हणाले की, लोक मतदानास पात्र नाहीत. जर मतदारांनी केवळ जातीच्या आधारावर मतदानाचे बटण दाबले, तर निवडणूक प्रणालीच्या सचोटीला काही अर्थ उरत नाही.

ते म्हणाले की, नितीश कुमार असोत, तेजस्वी यादव असोत किंवा इतर कोणताही नेता मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला तरी, सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत जीवनात, गरिबीत, भुकेच्या प्रश्नावर आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल