अजित पवार ‘पुन्हा येईनात’, जयंत पाटील, वळसे पाटलांना मन वळवण्यात अपयश

| Updated on: Nov 24, 2019 | 3:20 PM

दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही अजित पवारांशी जवळपास दोन तास चर्चा करुन परतले

अजित पवार पुन्हा येईनात, जयंत पाटील, वळसे पाटलांना मन वळवण्यात अपयश
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. परंतु अजित पवार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे दोन्ही नेत्यांना रिकाम्या हाती (NCP leaders Conviencing Ajit Pawar) परतावं लागलं.

चुलत बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे, पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवारांना माघारी फिरण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही अजित पवारांची भेट घेऊन आले. तिघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. परंतु अजित पवार माघारी फिरण्याच्या मनस्थितीत नाहीत.

अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीकडून वारंवार त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न होत आहेत.

अजित पवार कालचा दिवस बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी थांबले होते. त्यांच्यासोबत पुत्र पार्थ पवारही होते. त्यानंतर आज सकाळी दोघं मुंबईतील निवासस्थानी गेले.

राजकीय वारसदाराबाबत चर्चा

‘राष्ट्रवादीचे 54 पैकी 53 आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील. अजित पवार एकटे पडतील. शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला. सुप्रिया सुळे अभिनंदन’ अशा आशयाचं ट्वीट काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केलं होतं.

हक्काची माणसं दुरावू नयेत, रोहित पवारांची काका अजित पवारांना भावनिक साद

शरद पवार यांचे राजकीय वारसदार अजित पवार की सुप्रिया सुळे हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असं मोघम उत्तर बऱ्याचदा दिलं जातं. अजित पवारांच्या आग्रहामुळे निवडणुकीत उतरलेले त्यांचे पुत्र पार्थ पवार पडले. तर शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी राजकारणात दमदार एन्ट्री घेतली. त्यामुळे रोहित पवारांचं नावही वारसदारांच्या शर्यतीत घेतलं जातं. यामुळे अजित पवार बिथरल्याचीही चर्चा आहे.

अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संख्याबळ दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना भुलवून त्यांनी राजभवनावर नेल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. परंतु पक्षातील त्यांचं सदस्यत्व कायम (NCP leaders Conviencing Ajit Pawar ) आहे.