Raza Academy : वंदे मातरम म्हणण्याच्या मंत्री मुनगंटीवारांच्या आदेशावरून नवा वाद, मुनगंटीवारांच्या आदेशाला रझा अकादमीचा विरोध

सईद नुरी म्हणाले, आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. वंदे मातरम ऐवजी दुसरा पर्याय द्यावा. असा पर्याय द्यावा की, जो सर्वांना मान्य असेल. यासंदर्भात आम्ही उलेमा आणि संबंधितांशी चर्चा करणार आहोत.

Raza Academy : वंदे मातरम म्हणण्याच्या मंत्री मुनगंटीवारांच्या आदेशावरून नवा वाद, मुनगंटीवारांच्या आदेशाला रझा अकादमीचा विरोध
मुनगंटीवारांच्या आदेशाला रझा अकादमीचा विरोध
| Edited By: | Updated on: Aug 15, 2022 | 2:32 PM

मुंबई : वंदे मातरम म्हणण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशावर (Order) नवा वाद ओढवला आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या आदेशाला रझा अकादमीनं विरोध केलाय. राज्य सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याच्या आदेशाला रजा अकादमीचा विरोध आहे. सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला आहे की, शासकीय कर्मचारी हॅलोच्या (Hello) ऐवजी वंदे मातरम बोलणार. यावर रझा अकादमी यांनी विरोध दर्शविला आहे. रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला. आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. म्हणून त्याऐवजी सरकारने काही दुसरा पर्याय द्यावा जो सर्वाना मान्य असेल. याबाबत आम्ही उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून सरकारला पत्र लिहिणार असल्याचं रझा अकादमीचे सईद नुरी (Saeed Noori) यांनी सांगितलं.

हॅलो ऐवजी वंदे मातरमने संभाषण

राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्‍कृतिक खात्‍याची जबाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाची घोषणा केली आहे. हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. याचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरमने संभाषणाला सुरुवात करतील, अशी ही घोषणा आहे. वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारत मातेविषयीच्या भावनांचे प्रतीक आहे. अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापुढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु केले जाणार आहे. 1800 साली टेलिफोन अस्‍तित्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलोऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला आहे. सईद नुरी म्हणाले, आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. वंदे मातरम ऐवजी दुसरा पर्याय द्यावा. असा पर्याय द्यावा की, जो सर्वांना मान्य असेल. यासंदर्भात आम्ही उलेमा आणि संबंधितांशी चर्चा करणार आहोत. राज्य सरकारला पत्र लिहू. यातून काहीतरी तोडगा काढू. त्यामुळं मुनगंटीवारांनी घेतलेला पहिलाच निर्णय हा आता वादात आलाय.