“साहेबांना पेढे मिळाले नाहीत म्हणून राग आला अन् म्हणाले, सरकार सहा महिने टिकेल!”, निलेश राणेंचं ट्विट

Nilesh Rane : पेढे मिळाले नाहीत म्हणून इतका राग?- निलेश राणे

साहेबांना पेढे मिळाले नाहीत म्हणून राग आला अन् म्हणाले, सरकार सहा महिने टिकेल!, निलेश राणेंचं ट्विट
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 11:07 AM

मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) शिंदे सरकार फार काळ टिकणार नाही, मध्यावधी निवडणुका लागतील अशी भविष्यवाणी केली. त्यानंतर भाजपकडून त्यांच्या या विधानावर टीका होतेय. भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी “पवार बोलतात त्याच्याविरूद्ध घडतं, आमचं सरकार पुढची दशकानुदशके टिकेल”, असा विश्वास व्यक्त केला. तर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक ट्विट करत आपला विरोध दर्शवला आहे. “साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची चर्चा होतेय.  तर पवारांचं मत योग्य आहे, राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असं महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत.

पेढे मिळाले नाहीत म्हणून इतका राग?- निलेश राणे

भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्विट करत शरद पवारांच्या विधानाला आपला विरोध दर्शवला आहे. “साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

निलेश राणेंचं ट्विट

दरेकर काय म्हणाले?

सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता प्रवीण दरेकरांनी फेटाळली. शरद पवार जे बोलतात त्याच्या बरोबर उलट घडतं, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे पुढची काही दशकं हे सरकार काम करत राहिल, असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. पवार म्हणाले होते, की आमदार मुंबईत आल्यावर त्यांचं मतपरिवर्तन होईल. पण तसं काही झालं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला धक्का लागण्याची कोणतीही शक्यता नाही, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय.

मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवावी लागेल-थोरात

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही मोठं विधान केलं आहे. एकंदर ज्या पद्धतीने सरकार बनले त्याची स्थिती पाहता हे चालणार आहे का हे तर वादाचे आहे. या सरकारवर शंका येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवावी लागेल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. थोरात यांच्या या विधानामुळे काँग्रेसही मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.