Mohan Bhagwat: खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरेही करतात: मोहन भागवत

Mohan Bhagwat : देशात सध्या लोकसंख्येवरून चर्चा सुरू आहे. यूएनच्या रिपोर्टनुसार भारत लवकरच लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहे. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचं हे विधान आलं असून त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमात त्यांनी विकासावरही चर्चा केली.

Mohan Bhagwat: खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरेही करतात: मोहन भागवत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2022 | 10:12 AM

नवी दिल्ली: खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरेही करतात. जंगलात सर्वाधिक शक्तीशाली झालं पाहिजे. मात्र, इतरांना मदत करणं ही मानवाची ओळख आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांनी सांगितलं. श्री सत्य साई यूनिव्हर्सिटी फॉर ह्युमन एक्सिलेन्सच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते. भविष्यातील अभ्यास आणि भुतकाळातील ज्ञानाचा आधार सोबत घेऊन भारताला (bharat)  पुढे नेण्याचे संकेत मिळत आहेत. भारत प्रगती करेल असं दहा बारा वर्षापूर्वी कुणी म्हटलं असतं तर त्याला आम्ही गंभीरपणे घेतलं नसतं. राष्ट्राची प्रक्रिाय निरंतर सुरू झाली नाही. 1857पासून ही प्रक्रिया सुरू झाली. स्वामी विवेकानंदांनी (swami vivekanand) ती पुढे नेकली. अध्यात्माद्वारे श्रेष्ठत्व प्राप्त केलं जाऊ शकतं. कारण विज्ञान अजून सृष्टीतील स्त्रोताला समजून घेऊ शकलेलं नाही, असं भागवत म्हणाले.

केवळ जिवंत राहणं हा आयुष्याचा उद्देश असू नये. मनुष्याची अनेक कर्तव्य असतात. ती वेळोवेळी पार पाडली पाहिजे. केवळ खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरेही करतात. शक्तीशालीही जिवंत राहतो हा जंगलाचा नियम आहे. पण तोच शक्तिशाली जर दुसऱ्यांचे रक्षण करत असेल तर तो मनुष्य असल्याचा पुरावा आहे, असं मोहन भागवत म्हणाले.

देशाने विकास केलाय

देशात सध्या लोकसंख्येवरून चर्चा सुरू आहे. यूएनच्या रिपोर्टनुसार भारत लवकरच लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहे. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचं हे विधान आलं असून त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमात त्यांनी विकासावरही चर्चा केली. देशाने गेल्या काही वर्षात मोठा विकास केला आहे. आपण बराच विकास पाहिला आहे. इतिहासाकडून शिकून भविष्याचा विचार करून भारताने गेल्या काही वर्षात चांगला विकास केला आहे, असंही ते म्हणाले.

भाषा, धर्म वेगळा असेल तर वाद होतो

जर तुमची भाषा वेगळी असेल तर वाद होणार. तुमचा धर्म वेगळा असेल तर वाद होणार. तुमचा देश वेगळा असेल तर वाद होणार. पर्यावरण आणि विकासात नेहमीच वाद झाला आहे. गेल्या हजार वर्षात अशा पद्धतीने जगाचा विकास झाला आहे, असंही ते म्हणाले. यावेळी कस्तुरीरंगन, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, पंडित एम. व्यंकटेश कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी भागवत यांनी धर्मांतरावर बंदी घालण्यावर जोर दिला होता. धर्मांतरामुळे व्यक्ती आपल्या मूळापासून वेगळा होतो असं त्यांनी म्हटलं होतं.