कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि तूप… पंकजा मुंडे यांनी कोणती भन्नाट रेसिपी बनवली?

पंकजा मुंडे हे नाव नेहमीच चर्चेत असणारे आहे. पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणातील मोठे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय दिसत आहेत. सतत सोशल मीडियावर त्या खास फोटो शेअर करताना दिसत आहेत. प्रत्येक अपडेट शेअर करत आहेत.

कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि तूप... पंकजा मुंडे यांनी कोणती भन्नाट रेसिपी बनवली?
| Updated on: Dec 21, 2023 | 3:20 PM

मुंबई : भाजप नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे या कायमच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय दिसत आहेत. सतत खास व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतायंत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका व्हिडीओमध्ये त्यांचे देवघर दाखवले आणि त्या व्हिडीओमध्ये त्या पूजा करताना दिसल्या. हेच नाही तर त्यांना चश्मा लागला, त्याचा देखील त्यांनी व्हिडीओ शेअर केला. राजकारणात सक्रिय असण्यासोबतच त्या सोशल मीडियावरही सतत अपडेट शेअर करताना दिसत आहेत.

नुकताच पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यांचा हा व्हिडीओ त्यांच्या समर्थकांना चांगलाच आवडल्याचे बघायला मिळतंय. तो व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. एका खास पदार्थाची रेसिपी शेअर करताना पंकजा मुंडे या दिसत आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पंधरा मिनिटांपेक्षाही अधिकचा आहे.

या व्हिडीओमध्ये पंकजा मुंडे यांच्या किचनची एक झलक देखील बघायला मिळतंय.  व्हिडीओमध्ये पंकजा मुंडे यांनी दालमखनीची रेसिपी शेअर केलीये. या व्हिडीओमध्ये त्या दालमखनी तयार करताना दिसत आहेत. पंकजा मुंडे यांनी व्हिडीओच्या सुरूवातीलाच हे स्पष्ट केले की, त्यांना स्वयंपाक खूप जास्त छान बनवता येतो आणि जेंव्हाही वेळ मिळतो त्यावेळी त्या काही खास पदार्थ तयार करतात.

पंकजा मुंडे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर त्यांचे समर्थक हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांच्या मुलाने विदेशातून आणलेले खास गिफ्ट दाखवताना दिसल्या. मुलाने त्यांच्यासाठी विदेशातून एक खास कप आणल्याचे सांगताना पंकजा मुंडे दिसल्या.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, पंकजा मुंडे या आता राज्याच्या राजकारणात नव्हे तर थेट दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. राजकीय वर्तुळात याबद्दलची जोरदार चर्चा होताना दिसतंय. याबद्दल प्रवीण दरेकर यांनी मोठे विधान देखील केले होते. पंकजा मुंडे भाजपच्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात जाणार असल्याची चर्चा अजूनही सुरू आहे. मात्र, त्यावर अजूनही पंकजा मुंडे यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे विधान करण्यात नाही आले.