AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Mother Update | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची प्रकृती खालावली, हेल्थ बुलेटिनमध्ये काय माहिती?

PM Modi Mother Health Update LIVE In Marathi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवर अहमदाबाद येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

PM Modi Mother Update | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची प्रकृती खालावली, हेल्थ बुलेटिनमध्ये काय माहिती?
Image Credit source: social media
| Updated on: Dec 28, 2022 | 3:08 PM
Share

अहमदाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हीराबेन (Heeraben) यांच्या प्रकृती अचानक बिघडली आहे. बुधवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. यूएन मेहता रुग्णालयात (UN Mehta Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयाच्या वतीने नुकतेच हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच त्यांची भेट घेण्यासाठी अहमदाबादेत येतील, असे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयात नेत्यांच्या रांगा

हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर गुजरातमधील आमदार आणि नेत्यांच्या त्यांना भेटण्यासाठी रांगा लागल्या आहेत. एकानंतर एक आमदार हीराबेन यांच्या भेटीसाठी रुग्णालयात येत आहेत.

हीराबेन यांचं वास्तव्य सध्या गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ पंकजभाई यांच्यासोबत रायसन येथे वृंदावन बंगला-2 येथे आहे. हीराबेन यांचा जन्म 18 जून 1923रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाच्या 100 व्या वर्षात प्रवेश केला.

हेल्थ अपडेट काय?

यूएन मेहता रुग्णालयाने हीराबेन यांच्या प्रकृतीविषयी मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. हीराबेन यांच्यावर यूएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी अँड रिसर्च सेंटर, अहमदाबाद येथे उपचार सुरु आहेत.

5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान केलं होतं. गांधीनगर जवळील रायसन गावात त्यांनी मतदान केलं होतं.

त्या आधी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईची भेट घेऊन आशीर्वाददेखील घेतले होते.

जून महिन्यात हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आठवणी जाग्या करणारा भावनिक ब्लॉग लिहिला आहे.

त्यात त्यांनी लिहिलंय… आज, मुझे यह बताते हुए बेहद खुशी और सौभाग्य की अनुभूती हो रही है कि मेरी मां श्रीमती हीराबा मोदी अपने 100 वे साल में प्रवेश कर रही है. यह उनका जन्म शताब्दी वर्ष होने जा रहा है”

 

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...