AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर बिहार विधानसभेच्या मैदानात!, ‘प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडी’सोबत हातमिळवणी

मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. आरोप प्रत्यारोप आणि आश्वासनांनी जोर धरलाय. अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारच्या वंचित समाजाला राजकारणात उचित स्थान प्राप्त करुन देण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर ट्विटरद्वारे जाहीर केलंय. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन […]

प्रकाश आंबेडकर बिहार विधानसभेच्या मैदानात!, 'प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडी'सोबत हातमिळवणी
sagar joshi
sagar joshi | Updated on: Oct 14, 2020 | 8:50 AM
Share

मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. आरोप प्रत्यारोप आणि आश्वासनांनी जोर धरलाय. अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारच्या वंचित समाजाला राजकारणात उचित स्थान प्राप्त करुन देण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर ट्विटरद्वारे जाहीर केलंय. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर नाही, तर प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत दंड थोपटले आहेत. (Prakash Ambedkar’s Vanchit Bahujan Aaghadi will contest Bihar election )

‘बिहारमधील वंचित समाज घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत निवडणूक लढवत आहे. आपणाला विनंती आहे की या कार्यात सहकार्य करा,’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी बिहारच्या जनतेला आवाहन केलं आहे. राजकारण म्हणजे आज श्रीमंतांची गुलामी बनलं आहे. अनेक मोठे पक्ष श्रीमंतांकडून पैसे घेऊन त्यांच्यासाठीच राजकारण करतात, जे वंचित घटकांच्या हिताचे शत्रू आहेत. त्यामुळं आपली स्वतंत्र ताकद निर्माण करण्यासाठी आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला स्वत:च्या पायावर उभे राहावे लागेल, असं आवाहनही आंबेडकर यांनी बिहारमधील वंचित घटकांना केलं आहे.

आरक्षण आणि आपलं अस्तित्व अबाधित राखायचं असेल तर आपल्या ऐपतीप्रमाणे जास्तीत जास्त मदत करा. तुमच्या छोट्या योगदानातूनच तुमची मोठी ताकद निर्माण होणार असल्याचं आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्रात एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेत राजकारणात खळबळ माजवून देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता बिहार निववडणुकीसाठीही शड्डू ठोकला आहे. अशावेळी बिहारमधील वंचित घटक आंबेडकरांना कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रामविलास पासवान यांच्या निधनामुळं बिहारच्या गोरगरीब जनतेच्या नेतृत्वात पोकळी?

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं ८ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झालं. आपल्या राजकीय कारकिर्दीत पासवान बिहारमधील गोरगरीब जनतेचा आवाज बनले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळं गोरगरीबांचा वाली हरपल्याची भावना बिहारच्या जनतेत निर्माण झाली होती. अशावेळी पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षाचं नेतृत्व हाती घेतलं आहे. तेव्हा प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत प्रकाश आंबेडकरांनी केलेली हातमिळवणी आणि बिहारच्या जनतेला केलेलं आवाहन किती कामी येतं?, हे पाहावं लागेल.

काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप!

काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. ‘बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए उरली नाही. जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्षातील वाद बिहारची जनता पाहते. यामागे भाजपचा हात आहे. भाजपनं चिराग पासवान यांचा वापर करत आहे’, असा आरोप अन्वर यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

नितीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानचा वापर- तारिक अन्वर

Bihar Election | शिवसेनेची मागणी मान्य, बिहार निवडणुकीसाठी सेनेचं चिन्ह ठरलं

Prakash Ambedkar’s Vanchit Bahujan Aaghadi will contest Bihar election

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...