नितीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानचा वापर- तारिक अन्वर

पाटना: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आता काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. ‘बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए उरली नाही. जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्षातील वाद बिहारची जनता पाहते. यामागे भाजपचा हात आहे. भाजपनं चिराग पासवान यांचा वापर करत आहे’, असा […]

नितीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानचा वापर- तारिक अन्वर
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 7:03 PM

पाटना: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आता काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. ‘बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए उरली नाही. जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्षातील वाद बिहारची जनता पाहते. यामागे भाजपचा हात आहे. भाजपनं चिराग पासवान यांचा वापर करत आहे’, असा आरोप अन्वर यांनी केलाय. ( Tariq Anwars serious alligations against BJP)

बिहारच्या जनतेला सत्य परिस्थिती माहिती आहे. सत्ताधारी भाजप आणि जनता दल युनायटेड सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे आणि भाजपला ही वस्तूस्थिती मान्य आहे. त्यामुळेच नितीश कुमार यांच्याविरोधात वातावरण निर्मितीसाठी भाजपने चिराग पासवान यांना पुढे केल्याचा आरोप अन्वर यांनी केलाय.

बिहारमध्ये काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण असल्याचा दावा तारिक अन्वर यांनी केलाय. राहुल गांधी हे बिहार निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अन्य काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्रीही बिहार निवडणूक प्रचारात उतरणार असल्याची माहिती अन्वर यांनी दिली आहे.

काँग्रेस पहिली यादी जाहीर, दुसरी आणि तिसरी कधी?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी उद्या काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असंही अन्वर यांनी म्हणाले.

पती-पत्नीच्या सरकारमुळं बिहार आजारी, आम्ही इलाज केला- नितीश कुमार

लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी या पती-पत्नीने 15 वर्ष बिहारवर राज्य केलं. त्यावेळी बिहारमध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था नव्हती. बिहार आजारी होतं. मात्र आमच्या काळात आम्ही सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था उभारली. आम्ही इलाज काय असतो हे जनतेला दाखवून दिलं, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलीय. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारात नितीश कुमार यांनी सोमवारी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी लालू यादव आणि राबडीदेवी यांच्यावर सडकून टीका केली

बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात महाराष्ट्राचे चेहरे!

बिहार विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश आहे. भाजपकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर फडणवीस हे भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. शिवसेना बिहारमध्ये आपले ५० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. त्यांच्या प्रचार खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे करणार आहेत. तर राष्ट्रवादीनेही शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही महत्वाच्या नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नावं जाहीर केली आहेत.

संबंधित बातम्या:

पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी, आम्ही इलाज करुन दाखवला, नितीश कुमारांचा हल्लाबोल

Bihar Election : काँग्रेसकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही, भाजप-जेडीयूचा हल्लाबोल

Tariq Anwars serious alligations against BJP

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.