Bihar Election | शिवसेनेची मागणी मान्य, बिहार निवडणुकीसाठी सेनेचं चिन्ह ठरलं

बिस्कीट चिन्हावर नापसंती दर्शवल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह दिलं आहे.

Bihar Election | शिवसेनेची मागणी मान्य, बिहार निवडणुकीसाठी सेनेचं चिन्ह ठरलं
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 4:51 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Vidhansabha Election) निवडणूक आयोगाने शिवसेनेला (Shivsena) बिस्कीट हे चिन्ह दिले होते. त्यावर शिवसेनेने तीव्र नापसंती व्यक्त करत चिन्ह बदलून द्यावं अशी मागणी केली होती. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत सेनेला तुतारी (Tutari) वाजवणारा मावळा हे चिन्ह दिलं आहे.

निवडणूक आयोगाने बिस्कीट हे चिन्ह बदलून द्यावं, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असे शिवसेनेने निवडणूक आयोगाला सुचवले होते. पण ही तीनही चिन्ह आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे काल कळवलं. निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला शिवसेनेची पसंती आहे.

नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या JDU ने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप घेतला होता. JDU ची निशाणी बाण आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्यबाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो असा JDU चा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने JDU चा आक्षेप ग्राह्य मानत शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही असे कळवले होते. तसेच निवडणूक आयोगाने शिवसेनेला निवडणुकीसाठी धनुष्यबाणाऐवजी दुसरे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह दिलं गेलं आहे.

बिहार निवडणुकीत शिवसेना 50 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्याची मोर्चेबांधणी देखील जोरात सुरु आहे. तसंच शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची घोषणा देखील पक्षनेतृत्वाने केली आहे. एकंदरितच झोकून देऊन बिहार निवडणुकीत शिवसेना नशीब आजमवणार आहे.

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरी

  • शिवसेनेने लढवलेल्या एकूण जागा – 80/243
  • एकूण मिळालेली मते – 2 लाख 11 हजार 131
  • तिसऱ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 07 (जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा, बोचहा)
  • चौथ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 02 (भमुआ, मनिहारी)
  • पाचव्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 01 (बलरामपूर)
  • एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मतं मिळाली होती. यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.
  • शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती (राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं – 1 लाख 85 हजार 437, एमआयएमला मिळालेली मतं – 80 हजार 248)

लोकसभा निवडणूक 2019

  • शिवसेनेने एकूण लढवलेल्या जागा – 14/40
  • एकूण मिळालेली मतं – 64 हजार

(Shiv Sena opposes Biscuit symbol in bihar election)

बिहार निवडणूक

कोरोनाच्या संकटात देशातील ही पहिली निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त)आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (NDA) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीएम-4, सीपीआय-6, सीपीआय(माले) -19, काँग्रेस-70 आणि राजद – 144 जागांवर लढणार आहे. 2015च्या विधानसभा निडणुकीत राजद-101, जेडीयू – 101 व काँग्रेस 41 जागांवर निवडणूक लढली होती. परंतु आता महाआघाडीचा घटक पक्ष जेडीयू भाजपसोबत गेला आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू मुख्य चेहरा आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे.

संबंधित बातम्या 

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला ‘बिस्कीट’, आम्हाला ते चिन्ह नको, सेनेची भूमिका

Bihar Election : आमची मतं शिवसेनेला जातात, नितीशकुमारांच्या आक्षेपानंतर ‘धनुष्यबाण’ गोत्यात 

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.