निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला ‘बिस्कीट’, आम्हाला ते चिन्ह नको, सेनेची भूमिका

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले आहे. मात्र शिवसेनेची बिस्कीट या चिन्हावर नापसंती आहे.  

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला 'बिस्कीट', आम्हाला ते चिन्ह नको, सेनेची भूमिका

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले आहे. मात्र शिवसेनेची बिस्कीट या चिन्हावर नापसंती आहे.  बिहारमधील सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जनता दल (JDU) पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतला आहे.  बाण हे जेडीयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाणाशिवाय उतरावं लागणार आहे. (Shiv Sena opposes Biscuit symbol in bihar election)

दरम्यान निवडणूक आयोगाला शिवसेनेने तीन पर्याय दिले होते. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन पर्यायांपैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली होती. पण यापैकी कोणतेच चिन्ह न मिळाल्याने शिवसेनेने निवडणूक आयोगाने दिलेल्या बिस्कीट या चिन्हाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवणारे पत्र लिहिले आहे.

निवडणूक आयोगाच्या उत्तराची शिवसेनेला प्रतीक्षा आहे. नितीश कुमार यांच्या JDU ने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप घेतला होता. JDU ची निशाणी बाण आहे.

शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्य बाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो असा JDU चा आक्षेपचा मुद्दा आहे.   निवडणूक आयोगाने JDU चा आक्षेप ग्राह्य मानत शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही असे कळवले होते.

त्यामुळे शिवसेनेला वेगळे चिन्ह उपलब्ध करून दिले जाईल असे निवडणूक आयोगाने कळवले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले. मात्र ते चिन्हं शिवसेनेला मान्य नाही. बिहार निवडणुकीत 50 जागा लढवण्याच्या तयारीत शिवसेना आहे.

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरी

  • शिवसेनेने लढवलेल्या एकूण जागा – 80/243
  • एकूण मिळालेली मते – 2 लाख 11 हजार 131
  • तिसऱ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 07 (जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा, बोचहा)
  • चौथ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 02 (भमुआ, मनिहारी)
  • पाचव्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 01 (बलरामपूर)
  • एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मतं मिळाली होती. यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.
  • शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती (राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं – 1 लाख 85 हजार 437, एमआयएमला मिळालेली मतं – 80 हजार 248)

लोकसभा निवडणूक 2019

  • शिवसेनेने एकूण लढवलेल्या जागा – 14/40
  • एकूण मिळालेली मतं – 64 हजार

(Shiv Sena opposes Biscuit symbol in bihar election)

बिहार निवडणूक

कोरोनाच्या संकटात देशातील ही पहिली निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त)आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (NDA) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीएम-4, सीपीआय-6, सीपीआय(माले) -19, काँग्रेस-70 आणि राजद – 144 जागांवर लढणार आहे. 2015च्या विधानसभा निडणुकीत राजद-101, जेडीयू – 101 व काँग्रेस 41 जागांवर निवडणूक लढली होती. परंतु आता महाआघाडीचा घटक पक्ष जेडीयू भाजपसोबत गेला आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू मुख्य चेहरा आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे.

संबंधित बातम्या 

Bihar Election : आमची मतं शिवसेनेला जातात, नितीशकुमारांच्या आक्षेपानंतर ‘धनुष्यबाण’ गोत्यात 

Published On - 6:04 pm, Sat, 10 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI