प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात, मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार; घातपाताचा संशय

| Updated on: Feb 19, 2022 | 1:41 PM

कामानिमित्त मालेगाव गेले असता त्यांच्या गाडीला पहिला अपघात झाला. त्यावेळी सुध्दा त्यांच्या गाडीच्या समोर अचानक एक मोटारसायकल चालक आल्याचे त्यांनी सांगितले. कारण त्यावेळी चालकांने वेगावर कंट्रोल त्यामुळे कोणालाही इजा झाली.

प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात, मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार; घातपाताचा संशय
अपघात झाल्यानंतर गाडीची पाहणी करताना प्रवीण दरेकर
Follow us on

मुंबई – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांच्या गाडीला आज सकाळी जोगेश्वरी (jogeshwari) विक्रोळी (vikroli) लिंक रोडवरती एनएसजी (NSG) कॅम्पजवळ अपघात झाला. या महिनाभरात दरेकरांच्या गाडीला तिस-यांदा अपघात झाला असून तिन्ही अपघात एकसारखे असल्याचे प्रवीण दरेकरांनी टिव्ही 9 शी बोलताना सांगितले. तिन्ही अपघातात मोटारसायकल स्वार अचानक पुढे आल्याने अपघात झाला आहे. त्यामुळे माझ्यासह माझ्यासहका-यांना देखील संशय निर्माण झाला असून याबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे दरेकरांनी सांगितले. तसेच मी विरोधी पक्षनेता असल्याने मला राज्यभर फिरावं लागतं. परंतु अशा पध्दतीने अपघात होत असल्याने मनात शंका आहे. तिन्हीवेळा गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. पंधरा दिवसांपासून ही अपघाताची मालिका सुरू असून आजचा हा प्रकार तिस-यांदा झाला आहे. त्यामुळे मी चौकशी करणार असल्याचे देखील दरेकरांनी सांगितले.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळ अपघात

विरोधी पक्षनेता असल्यानंतर संपुर्ण राज्यात फिरावं लागतं. तसेच अनेकदा हा प्रवास किती दिवस होईल हेही निश्चित नसतं. पण दरेकरांच्यासोबत सुरू झालेली अपघाताची मालिका संपण्याचं नाव घेत नसल्याचे दिसत आहे. आज कामानिमित्त प्रवीण दरेकर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळून जात असताना त्यांच्या समोरून अचानक एक मोटारसायकल स्वार आल्याने त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक लोक गाडीत होती. त्यामुळे सहका-यांना काहीतरी घातपाताचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या गाडीला देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून त्याची चौकशी करायला लावणार आहे.

तिन्ही अपघात एकसारखे

कामानिमित्त मालेगाव गेले असता त्यांच्या गाडीला पहिला अपघात झाला. त्यावेळी सुध्दा त्यांच्या गाडीच्या समोर अचानक एक मोटारसायकल चालक आल्याचे त्यांनी सांगितले. कारण त्यावेळी चालकांने वेगावर कंट्रोल त्यामुळे कोणालाही इजा झाली. परवा खंडाळ्या सुध्दा अचानक एक मोटारसायकल स्वार अचानक पुढे आला त्यावेळी सुध्दा आमच्या गाडीला नुकसान झालं. आज सुध्दा जोगेश्वरी लिंक रोडवरती अपघात झाल्याने प्रवीण दरेकर आणि त्यांच्या सहका-यांच्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून अपघाताची चौकशी करावी अशी मागणी करणार आहेत. दरेकरांच्या गाडीला तिन्हीवेळा झालेल्या अपघातात एकसारखे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत झालेल्या अपघातात दरेकरांना किंवा त्यांच्या सहका-यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला, काही महिला अडकल्या; गोरेगावात मनसेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

या मेगा IPO मध्ये 1 कोटी किरकोळ गुंतवणूकदार सहभागी होण्याची शक्यता, 25 हजार कोटी जमा होण्याचा अंदाज!

Ranji Trophy 2022: मुंबई विरुद्ध चेतेश्वर पुजाराचा फ्लॉप शो, चार चेंडूत खेळ खल्लास, टेस्ट करीयर संकटात

;