सकाळी की रात्री… दारू पिण्याची खरी मजा कधी, ‘तो’ क्षण केव्हा ठरतो खास?
आजकाल काही लोक कामाचा ताण किंवा थकवा कमी करण्यासाठी 'बिअर' पितात. पण दारु पिण्याची योग्य वेळ कोणाती... याबद्दल अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या...

धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला निवांत वेळेची गरज असते… त्यामुळे सर्व मित्रांमध्ये चर्चा सुरु होते आणि चर्चेचा विषय असते कधी आणि कुठे भेटायचं? मित्र भेटले म्हणजे दारू तर येणारच… मित्रांसोबत तो क्षण खास केव्हा ठरतो…. दारु पिण्याची खरी मजा कधी असते? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आजकाल काही लोक कामाचा ताण किंवा थकवा कमी करण्यासाठी ‘बिअर’ पितात. जर आपण याकडे अशा प्रकारे पाहिले तर, बिअर पिल्याने काही मिनिटांतच थकवा कमी होतो आणि उर्जेची भावना येते, परंतु अनेकदा प्रश्न पडतो की, बिअर पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? सकाळी की रात्री
सोशल मीडियावरही या मुद्द्यावर चर्चा सुरु असते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, दिवसाच्या वेळेनुसार बिअरचा शरीरावर होणारा परिणाम दिसून येतो. म्हणून, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, सकाळी बिअर पिणं चांगले की रात्री? तुमच्या शरीरासाठी कोणता पर्याय कमी हानिकारक आहे?
सकाळी बिअर पिणं योग्य मानलं जात नाही. सकाळी शरीर डिटॉक्स मोडमध्ये असतं आणि रिकाम्या पोटी पचन प्रक्रिया सुरू होते. अशा वेळी, अल्कोहोल शरीरात लवकर शोषले जातं, ज्यामुळे नशा वाढू शकते. याशिवाय, रक्तातील साखर कमी होऊ शकते आणि तुम्हाला दिवसभर झोप, चक्कर किंवा थकवा जाणवू शकतो. शिवाय, ही सवय हळूहळू व्यसनात बदलते, जी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हानिकारक आहे.
रात्री बिअर पिणे सकाळी पिण्यापेक्षा केव्हागी चांगलं मानले जातं, कारण शरीर दिवसभर सक्रिय राहतं आणि संध्याकाळपर्यंत पचनसंस्था सामान्य होते. पण, रात्री बिअर पिताना संतुलन राखणं महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी बिअर पिल्याने झोपेची गुणवत्ता बिघडू शकते, वारंवार लघवी झाल्यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी हँगओव्हर देखील होऊ शकतो. रात्री आणि हलक्या जेवणासोबत मर्यादित प्रमाणात बिअर पिणे चांगलं असतं.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळची वेळ ही बिअरसह कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल पिण्यासाठी योग्य नाही. जर तुम्हाला बिअर प्यायचीच असेल तर तुम्ही आठवड्यातून मर्यादित प्रमाणात ती पिऊ शकता… रात्रीच्या सुरुवातीच्या वेळी बिअर पिणे अधिक सुरक्षित मानले जाते. याचा झोपेवर कमी परिणाम होतो आणि शरीर ते अधिक सहजपणे पचवू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नेहमी मर्यादित प्रमाणात मद्यपान करा आणि दारू रोजची सवय बनवू नका. शिवाय काही आरोग्याच्या समस्या असतील तर, डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या…
