AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजितदादा, राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते, पण नाना पटोलेंना काही वाईट वाटलं असेल तर मी त्यांच्याशी बोलेल”

Supriya Sule on Nana Patole : मोठा भाऊ की छोटा भाऊ? अजित पवार यांच्या 'त्या' वक्तव्यावरून मविआमध्ये नाराजी?;वाचा...

अजितदादा, राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते, पण नाना पटोलेंना काही वाईट वाटलं असेल तर मी त्यांच्याशी बोलेल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 21, 2023 | 4:18 PM
Share

पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर भाष्य केलंय. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलंय. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे का? अशी चर्चा होतेय. या सगळ्यात आता सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आहे.

अजित पवार यांचं वक्तव्य

या आधी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा अधिक असायच्या. त्यावेळी जागा वाटप करताना आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी जागा मिळायच्या. पण आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण काँग्रेसच्या 44 जागा आहेत. तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावरून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही मोठे होतो तेव्हा कधीच गर्व केला नाही त्यांनीही गर्व करू नये. आम्ही नेहमी मोठे होतो मात्र आम्ही कधीही त्याचा गर्व केला नाही. सर्वांना सोबत घेऊन चाललो. आम्ही मोठे भाऊ असा काँग्रेसने कधीच असा घमंड केला नाही. अजित दादांना काय बोलायचं काय नाही यावर मी बोलणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

…तर मी बोलेन

नाना पटोलेंना काही वाईट वाटलं असेल तर मी स्वतः त्यांच्याशी बोलेल, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत. त्यांचं काही मतं असेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात विकासकामांमध्ये खूप व्यस्त आहोत. अध्यक्षपदाबाबत शरद पवारसाहेबांनी सांगितलं आहे की, समंजसपणाने आम्ही प्रश्न सोडवू. त्यामुळे आम्ही बोलण्याचा प्रश्न येत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणालेत.

मोदींशिवाय भाजपकडे दुसरं कोणी नाही. मोदी सगळीकडेच जातात त्यात नवीन काय? मोदींचा महाराष्ट्रात काही परिणाम होईल का ? असं विचारताचं काळ ठरवेल असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ