मोहन भागवत यांना सत्य माहिती, पण ते स्वीकारण्यास घाबरतात : राहुल गांधी

| Updated on: Oct 25, 2020 | 4:24 PM

"मोहन भागवत यांना सत्य माहिती आहे. पण ते स्वीकारण्यास घाबरतात", अशी टीका राहुल गांधी यांनी केली (Rahul Gandhi on Mohan Bhagwat)

मोहन भागवत यांना सत्य माहिती, पण ते स्वीकारण्यास घाबरतात : राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना चीनशी संबंधित जे मत मांडलं त्यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. “चीनने भारताच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे, हे मोहन भागवत यांना माहित आहे. मात्र, ते सत्य स्वीकारण्यास तयार नाहीत”, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे (Rahul Gandhi on Mohan Bhagwat).

नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी मोहन भागवत आपल्या भाषणात ‘चीनने भारताच्या हद्दीत शिरुन जमिनीवर ताबा मिळवण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, यावेळी भारताने दिलेल्या प्रत्युत्तराने चीनला धक्का बसला आहे”, असं मत मांडलं होतं. त्यांच्या याच मतावर राहुल गांधी यांनी टीका केली (Rahul Gandhi on Mohan Bhagwat).

“मोहन भागवत यांना सत्य माहिती आहे. पण ते स्वीकारण्यास घाबरतात. खंरतर चीनने आपल्या जमिनीवर अनधिकृतपणे ताबा मिळवला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने आणि संघाने चीनला ते करु दिलं”, असा आरोप राहुल गांधी केला आहे.

मोहन भागवत चीनबाबत नेमकं काय म्हणाले?

“आमची सर्वांसोबत मित्रत्वाची भावना आहे. कारण तो आमचा मुळ स्वभाव आहे. मात्र, आमच्या सद्भावनालाच आमची कमतरता मानून स्वबळाचं प्रदर्शन करुन कुणीही भारताला झुकवू शकत नाही. ते कदापि शक्य नाही, हे तरी आता त्यांच्या लक्षात यायला हवं”, असा इशारा मोहन भागवत यांनी दिला.

“संपूर्ण जगाने बघितलं की, चीन भारताच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचं विस्तारवादी धोरण इतर काही देशांनीदेखील अनुभवलं आहे. तैवान, व्हिएतनाम, अमेरिका, जपान या देशांसोबत त्याचं भांडण सुरु आहे. मात्र, भारताच्या प्रत्युत्ताने चीन अस्वस्थ झाला आहे”, असं मोहन भागवत म्हणाले आहेत.

संबंधित बातमी :

मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही, लडाख सीमेवरील भारतीय सैन्याच्या शौर्यानंतर भागवतांचा शत्रूराष्ट्रांना इशारा