Rajya Sabha Election 2022 : भाजपचे तिनही उमेदवार विजयी होणार, महाजनांच्या पीएने लावली 1 लाखाची शर्यत! राष्ट्रवादीच्या पठ्ठ्यानंही स्वीकारलं आव्हान

| Updated on: Jun 10, 2022 | 9:58 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निर्णय आल्यावरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अशावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून विजयाचा दावा केला जातोय. मात्र आता दोन्ही बाजूचे कार्यकर्तेही दावे प्रतिदावे करत आहेत. इतकंच नाही तर लाखाच्या शर्यती लागल्या आहेत.

Rajya Sabha Election 2022 : भाजपचे तिनही उमेदवार विजयी होणार, महाजनांच्या पीएने लावली 1 लाखाची शर्यत! राष्ट्रवादीच्या पठ्ठ्यानंही स्वीकारलं आव्हान
गिरीश महाजनांच्या पीएचं ओपन चॅलेंज
Image Credit source: TV9
Follow us on

जळगाव : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलेलं आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात होते. या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप नेत्यांनी एकमेकांच्या काही मतांवर आक्षेप घेतल्यामुळे अद्याप मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. दोन्ही बाजूने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) निर्णय आल्यावरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अशावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून विजयाचा दावा केला जातोय. मात्र आता दोन्ही बाजूचे कार्यकर्तेही दावे प्रतिदावे करत आहेत. इतकंच नाही तर लाखाच्या शर्यती लागल्या आहेत.

भाजप नेते गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी भाजपचे तिनही उमेदवार विजयी होणारच असा दावा केलाय. इतकंच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर ओपन चॅलेंज दिलं आहे. देशमुख यांनी फक्त चॅलेंजच दिलं नाही तर 1 लाखाची शर्यतही लावली आहे आणि ती स्वीकारण्याचं आवाहनही त्यांनी दिलं आहे. देशमुखांनी दिलेलं हे आव्हान कोण स्वीकारणार? अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली. सोशल मीडियावरील ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राहुल पाटील यांनेही ते स्वीकारलं आहे. त्यामुळे ही लाखाची शर्यत कोण जिंकणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

मतमोजणी लांबणीवर का पडली?

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. त्याला भाजप आणि महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणीला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या आक्षेपांवर निर्णय घेईल आणि त्यानंतरच मतमोजणी होईल.

हे सुद्धा वाचा

आक्षेपाचं राजकारण

जितेंद्र आव्हाड यांनी जयत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. तर यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यांमुळे ही दोन्ही मतं बाद करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजाराचे आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. त्यांना मतदानाला परवानगी देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे एका एका मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं आज पाहायला मिळालं. त्यानंतर काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका बावनकुळे आणि शेलारांकडे दिल्याचा आरोप अमर राजूरकर यांनी केलाय.