शिवसेना, भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही पवार यांनी सरकार बनवलं, हा सत्तेचा दुरुपयोग नाही का ? रावसाहेब दानवेंचा टोला

त्तेचा दुरुपयोग हा केंद्र सरकारकडून केला जात नाही. राज्यात शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं तरीही सरकार बनवलं, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.

शिवसेना, भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही पवार यांनी सरकार बनवलं, हा सत्तेचा दुरुपयोग नाही का ? रावसाहेब दानवेंचा टोला
रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 12:00 AM

पुणे : सत्तेचा दुरुपयोग हा केंद्र सरकारकडून केला जात नाही. राज्यात शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं तरीही सरकार बनवलं, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. ते पुण्यात एका कर्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले असताना ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं.

रावसाहेब दानवे यांची शरद पवार यांच्यावर टीका

केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जातो. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला जातो, असं वक्तव्य शरद पवार नेहमी करत असतात. याच वक्तव्यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. सत्तेचा दुरुपयोग केंद्र सरकारकडून केला जात नाही. उलट राज्यात केला जातो. शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं. पण सरकार बनवलं हा सत्तेचा दुरुपयोग नाही का ? असा सवाल दानवे यांनी केला.

केंद्र सरकारमुळे इंधनाचे दर वाढलेले नाहीत

तसेच पुढे बोलताना वाढत्या इंधन दरवाढीवरदेखील त्यांनी भाष्य केलं. केंद्र सरकारमुळे इंधनाचे दर वाढलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय दराशी त्याचा संबंध आहे. याला राज्य सरकारही जबाबदार आहे, आंतरराष्ट्रीय दराशी जोडलेले असल्यामुळे देशात इंधनाचा दर वाढतो. तसेच मोदी सरकार अशा प्रकारे इंधनाची दरवाढ करणार नाही, असं दानवे म्हणाले.

वीजटंचाईला राज्य सरकारला ठरवलं होतं जबाबदार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात वीजनिर्मितासाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाची टंचाई भासत होती. राज्या अंधारात बुडण्याचे संकट समोर उभे ठाकले होते. यावेळीदेखील रावसाहेब दानवे यांनी वीजटंचाईला राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे कोळसा टंचाई झाली असा दावा त्यांनी केला होता. पावसाळ्यात खदाणीत पाणी साचने किंवा कोळसा भिजण्याची अडचण होते, त्यामुळे राज्यांना कोळसा उचलण्याच्या केंद्राने सूचना दिल्या होत्या. पण,  पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे टंचाई झाली. कोळसा टंचाईच्या संकटाला राज्य जबाबदार आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले होते.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

‘आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा’, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

मलिका आता वानखेडेवर वैयक्तिक आरोप करतायत? यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत सवाल

Varsha Gaikwad Compliant | वर्षा गायकवाड यांची सोनिया गांधींकडे तक्रार, थेट हायकमांडला पत्र लिहिल्यामुळे अचडणी वाढणार ?

(raosaheb danve criticizes sharad pawar and mahavika aghadi on petrol price hike)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.