महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
जळगाव : मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुक्ताईनगर विश्रामगृह येथे मोजक्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत झाली गुप्त बैठक
पक्ष बळकट करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले
इंदोर मध्यप्रदेशवरून परत विदर्भात जात असताना अचानक मुक्ताईनगरला थांबले, कमालीची गुप्तता पाळली
गुप्त बैठकीसंदर्भात कमालीची गुप्तता
नागपूर : बांधकाम सुरू असलेल्या ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला
नागपूरच्या कळमना परिसरातील घटना
कुठलीही जीवितहानी नाही, साधारण 100 फूटचा भाग कोसळला
अकोला : अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील कुटासा येथील अवैध गुटका विक्री केंद्रावर पोलिसांची धाड
पानटपरी चालकाला केले ताब्यात
दहीहंडा पोलिसांची कारवाई
नांदेड: किरीट सौमय्या दोन दिवसात नांदेडला येणार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती
कालच्या सूचक वक्तव्यानंतर पाटील यांचा आज थेट इशारा
पुणे : विविध पक्षातील महिला नेत्यांनी बिबवेवाडी खून प्रकरणातील आरोपीला कोर्टाचा आवारात दिला चोप
महिला नेत्यांची कोर्टाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी
पोलिसांनी हस्तक्षेप करुन त्याला कठोर शिक्षा देण्याबद्दल न्यायालयासमोर सुनावणी सुरु असल्याचे केलं स्पष्ट
भंडारा- भंडाऱ्यात गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या
4 गांजा तस्कराना लाखनी पोलिसांनी ठोकल्या बेडया
33 किलो 218 ग्रॅम गांजा, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
राजू शेट्टी उस परिषदेत बोलत आहेत. यावेळी ते ऊस आणि एफआरपीविषयी बोलत आहेत. एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे कारस्थान केले जात आहे. मुख्यमंत्री साहेब यामध्ये केवळा राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारदेखील आहे. एफआरपीचे तुकडे करण्याचा पाया केंद्र सरकारने घातला.
नागपूर कोरोना अपडेट -
नागपुरात आज 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
अनेक दिवसानंतर गाठला 10 चा आकडा
शून्य मृत्यू , तर एकाने केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या 493390
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 483242
एकूण मृत्यूसंख्या - 10120
महाराष्ट्रात साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये भेदभाव केला जातो. त्यामुळे एक समान कार्यक्रम असावा म्हणून आम्ही अमित शाह यांच्याकडे आम्ही चर्चा केली आहे.
आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर सहकार क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यात साखर कारखानदारीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली. बैठकीमधील चर्चा सकारात्मक झाली. कधी दुष्काळ तर कोविडमुळे साखर कारखाने अडचणीत आले. अकाऊंट एनपीएमध्ये गेले. यामुळे एनपीए झालेल्या साखर कारखान्यांना सरकारने पुन्हा कर्ज द्याव.रिस्ट्रक्चरिंग केलं जावं असे विषय अमित शहा यांच्याकडे मांडले. साखर कारखान्यांना उर्जितावस्था भेटण्यासाठी ही आजची बैठक महत्त्वाची आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस माध्यमांशी संवाद साधत आहेत. आम्ही अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या शिष्टमंडळाने शाह यांची भेट घेतली. आजच्या बैठकीत सकारात्मक आणि सहकारी कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल अशी बैठक पार पडली आहे. सहकारी साखर कारखान्यांना आयकर विभागाच्या नोटिशी आल्या आहेत. एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळजवळ गेले पंधरा ते वीस वर्षांपासून हा मुद्दा बाहेर येतो. सध्यादेखील हा मुद्दा बाहेर आला आहे. यावर कायमस्वरुपी उपाय काढायला हवा अशी अमित शहा यांच्याकडे मागणी केली. त्यांनी या प्रश्नावर सकारात्मक विचार करु असे फडणवीस म्हणाले.
नाशिक - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमातच कोरोना नियमांचा फज्जा
- नाशिकमध्ये के.के. वाघ शिक्षण संस्थेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा कोरोनाकाळातील विशेष कामगिरीबद्दल सत्कार समारंभ
- सोशल डिस्टन्सचा फज्जा, तर कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांसह अनेकांच्या तोंडावर मास्क नाही
आरोग्य भरतीतील तांत्रिक गोंधळावरील टिकेनंतर राज्य सरकारकडून परीक्षेची गंभीर दखल,
राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील उपसंचालक दर्जाच्या 8 अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून केली नेमणूक
8 अधिकारी संपूर्ण परीक्षा काळात करणार नियंत्रण
कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास सोडवण्याची दिली जबाबदारी,
राज्य आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केल्या नेमणुका,
24 ऑक्टोबरला होतीये गट क आणि ड विभागाची परीक्षा ...
वर्ध्याच्या पटेल चौकातील जुन्या नगर परिषद जवळ 100 वर्ष जुनी इमारत ढासळली
- इमारत पडण्याचा आवाज येताच इमारतीमधील एका कुटुंबाला सुखरूप हलविण्यात आले
- तीन सेकंदात ढासळला इमारतीचा डोलारा
- इमारतीच्या मलब्याखाली तीन दुचाकी सुद्धा आहे दबल्या
- इमारतीमध्ये गल्लीत लघुशंकेला गेलेल्या दोन व्यक्ती दबून असल्याची शक्यता
गडचिरोली -
जहाल नक्षली मंगरु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
मंगरु मडावी हा पेरमिली एलओएस मध्ये पेरमिली एलओएसच्या सदस्य पदावर भरती होवुन ॲक्शन टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता
त्याच्यावर 03 खुन, 01 चकमक असे एकुण 04 गंभीर गुन्हे दाखल आहेत
शासनाने जाहीर केले होते 02 लाख रूपयांचे बक्षीस
गडचिरोली पोलीस पथकाला मोठी यशस्वी
विसामुंडी पोमके नारगुंडा ता. भामरागड जि. गडचिरोली येथुन अटक
राज्यात 70 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण राज्यात लसीकरण आणखी वेगात वाढवणार लसीकरणात महाराष्ट्राचं मोठं योगदान लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा मिशन कवच कुंडल आणखी वेगाने राबवणार नगर नाशिकच्या सीमेवर कोरोना वाढला, मात्र घाबरुन जाण्याची गरज नाही प्रशासकीय यंत्रणा चांगलं काम करतायत मात्र दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, असा अंदाज आहे असं असलं तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्या तरी शक्यता नाही लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोनाचा धोका कमी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या अभियानात सहभाग घ्यावा राज्यात कोरोना व्हायरचा प्रकार बदलला नाही. डेल्टा प्रकार आढळून येत आहे. आताच तिसऱ्या लाटेचे संकेत नाहीत. मात्र, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र आपण काळजी घेतली आणि लसीकरण वेगवान केलं तर काळजी करण्याचं कारण येणार नाही.
वर्ध्याच्या पटेल चौकातील जुन्या नगर परिषद जवळ 100 वर्ष जुनी इमारत ढासळली
- इमारत पडण्याचा आवाज येताच इमारतीमधील एका कुटुंबाला सुखरूप हलविण्यात आले
- तीन सेकंदात ढासळला इमारतीचा डोलारा
- इमारतीच्या मलब्याखाली तीन दुचाकी सुद्धा आहे दबल्या
- इमारतीमध्ये गल्लीत लघुशंकेला गेलेल्या दोन व्यक्ती दबून असल्याची शक्यता
लखनौमध्ये प्रियांका गांधींचा नारा, 'लडकी हूँ, लड सकती हूँ!' प्रियांका गांधींचं मिशन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश निवडणुकीत 40 टक्के महिलांना काँग्रेस तिकीट देणार उन्नावच्या मुलीचं स्मरण करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अर्ज मागवणार आज उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेची अतिशय गंभीर परिस्थिती सत्तेचा दुरुपयोग याच्याआधी एवढा कधीच झाला नव्हता लखीमपूरमध्ये मला एक महिला भेटली, तिने मला पंतप्रधान होण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं उत्तर प्रदेशातील प्रत्येक महिलेचं काही ना काही स्वप्न आहे, त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला आहे की उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के महिलांना काँग्रेस उमेदवारी देणार
भुसावळ
भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाचे 4 दरवाजे 3.50 मीटरने उघडण्यात आले
धरणातून 37 हजार 716 क्यूसेस प्रमाणे पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात होता
गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीला
कॅबिनेट बैठकीच्या आधी अमित शाह मोदींच्या भेटीला
पंतप्रधान निवास स्थानी पोहचले अमित शाह
कल्याण पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक..
कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी केली अटक
कल्याणच्या ताल बार मध्ये बिल भरण्याच्या वादातून घातला धिंगाणा...
बार मॅनेजरला धमकवण्यासाठी टेबल वर ठेवली रिव्हॉल्व्हर..
हरीश्याम सिंग नावाच्या व्यक्ती कडे होती रिव्हॉल्व्हर..
हे सहा आरोपी पार्टी करण्यासाठी आले होते ताल बार मध्ये..
आरोपींपैकी एक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव उत्तम गोडे..
उत्तम घोडे हा टिटवाळा पोलीस ठाण्यात कार्यरत..
नाशिक - नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटाक्यांवर बंदी ..
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यना निर्देश
विशेष सभा घेऊन फटाके बंदी बाबत अप आपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे दिले आदेश..
विभागीय पातळीवर पहिल्यांदाच फटाक्यांवर बंदी..
राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा' योजने अंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांचा पुढाकार..
विभागीय आयुक्तांच्या निर्णयाने हिंदुत्ववादी संघटनांची नाराजी..
गोंदिया -
चार दिवसानंतरच्या अथक प्रयत्नांनंतर चांदणीचा मृतदेह हाती
चांदणीचा शोध घेण्यासाठी SDRF टीमला पाचारण
कालवाच्या सायफन मध्ये आढळला मृतदेह
सातारा
कटापूर उपसा जलसिंचन योजनेचे कोरेगाव चे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केले अचानक उद्घाटन
खटाव या दुष्काळी भागासाठी ही आहे महत्वपूर्ण योजना...
तब्बल 1300 कोटीच्या या योजनेतून खटाव तालुक्यातील 37 गावांचा पाणी प्रश्न निकाली...
20 वर्षांपासून रखडलेली होती ही जलसिंचन योजना....
आ.महेश शिंदे यांचा आ. शशिकांत शिंदे यांना जोरदार झटका
- पॅार्न बघून चार वर्षीय मुलीवर अत्याचार, परिसरात खळबळ
नाशिकच्या दुधबजार परिसरातील घटनेने खळबळ
व्हाईटनर देण्यावरून दोघा मित्रांमध्ये झाला होता वाद
व्हाईटनर न दिल्याने नशेबाजाने मित्रालाच चाकूने भोसकले
मयत रुग्णाचे नाव नितीन गायकवाड
खून करून संशयित आरोपी फरार
पोलिसांचा तपास सुरू
- शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचा धोका झाला कमी
कोल्हापूर -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज 20 वी ऊस परिषद
जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात होणार ऊस परिषद
राजू शेट्टी एफआरपी अधिक किती रकमेची मागणी करणार याकडे ऊस उत्पादकांच लक्ष
पहिल्यांदाच हंगामा आधी साखरेचे दर वाढल्याने ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही राहणार
महापुराच्या तुटपुंज्या नुकसान भरपाई वरही सरकार विरोधात राजू शेट्टी नव्याने आंदोलनाची हाक देणार का याकडे ही लक्ष
ऊस परिषदेची तयारी पूर्ण
औरंगाबाद -
पेट्रोल पंपवर कर्मचारी पेट्रोल देत नसल्यामुळे कलाकारांनी गाण्यातून केली पेट्रोलची मागणी
कलाकार गाण्यातून पेट्रोलची मागणी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
औरंगाबाद जळगाव महामार्गावरील चिंचखेडा पेट्रोल पंपावरील प्रकार
रात्री दीड वाजता पंपावर पोचलेल्या कला पथकाला मिळत नव्हते पेट्रोल
पेट्रोल मिळत नसल्यामुळे कलाकारांनी गाण्यातून केली पेट्रोलची विनंती
सोलापूर -
दोन जन्मठेपेच्या शिक्षा झालेल्या आरोपीने धारदार शस्त्राने केला तिसरा खून
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील घटना
आमसिद्ध पुजारी असे 65 वर्षीय आरोपीचे नाव
ज्ञानदेव प्रभू नागणसूरे एका 55 वर्षीय इसमाचा केला खून
धारदार शस्त्राने डोक्यावर मानेवर गुडघ्यावर वार करून केला खून
याआधी आमसिद्ध पुजारीने स्वतःच्या पत्नीचा सात वर्षांपूर्वी चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून केला होता खून
तर पंधरा वर्षापूर्वी अंत्रोळी येथील लक्ष्मण सलगरे नामक इसमाचा पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केला होता खून
खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर आला होता गावात
आरोपी आम सिद्ध पुजारी फरार
बुलडाणा जिल्ह्यातील 102 या रुग्णवाहिकेवरील चालकांचे वेतन मिळेना
जिल्ह्यातील 25 चालकांचे वेतन मागील 8 महिन्यापासून थकीत,
सण उत्सवाच्या काळातही कोरोना योध्यावर उपासमारीची वेळ,
चालक 24 तास सेवा देत असतानाही प्रशासनाकडून अडवणूक,
घर चालवायचे कसे चालकासमोर उभा राहिलाय प्रश्न
महाविद्यालये सुरु करण्याबाबत नागपूर विद्यापीठाचे अद्याप निशानिर्देश नाही
- 20 ॲाक्टोबर पासून महाविद्यालय सुरु करण्याची राज्य सरकारची परवानगी
- विद्यापीठाच्या लेटलतीफपणामुळे महाविद्यालये संभ्रमात
- बुधवारपासून विद्यार्थ्यांना बोलवायचे की नाही? महाविद्यालयांना पडला प्रश्न
पुणे
ससून रुग्णालयात म्युकर मायक्रोसिसचे नव्याने 5 रुग्ण उपचारासाठी दाखल
सध्या पुण्यात 44, पिंपरी-चिंचवडमध्ये 2, ग्रामीण भागात 3, तर ससून रुग्णालयात 95 अशा 144 जणांवर उपचार सुरू
आतापर्यंत पुण्यात 428, पिंपरी-चिंचवडमध्ये 264, ग्रामीण भागात 85 आणि ससून रुग्णालयात 363 अशा 1 हजार 140 रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडले
शहरासह जिल्ह्यात एकूण 217 जणांचा मृत्यू झाला असून, या आठवड्यात एकही मृत्युची नोंद नाही
पुणे
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणात मारली बाजी
शहरासह जिल्ह्य़ात आतापर्यंत ८८ टक्के ज्येष्ठांनी पहिली, तर ६४ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी दोन्ही घेतले डोस
इतर वयोगटातील अपेक्षित लाभार्थ्यांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सर्वाधिक झाल्याचे जिल्हा प्रशासनाची माहिती
पुणे
दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लाॅटरी काढण्यात येणार
यामध्ये दीड हजार घरे वीस टक्क्यातील व सर्व नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांची माहिती
अवकाळी पाउस आणि ऑक्टोबर हिटचा भाजीपाल्यांना फटका
भाजीपाला दरात वाढ
कोथिंबीर जुडी 80 रुपयांवर
टोमँटोसह गाजक मिरचीचे दरही वाढले
गवार 100 ते 120 रुपये किलो
वाटाणा 160 ते 180 रुपये किलो
बाजारात आवघ घटल्याने भाव वाढ
देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत,
अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता,
सहकार विभागाच्या बैठकीलाही राहणार उपस्थित
अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील चांगेफळ येथे 2 चिमुकल्यासह आईची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या
घरगुती वादातून केली आत्महत्या
गावापासून दीड किलोमीटरवर असलेल्या विहिरीत उडिघेवुन केली आत्महत्या
चांगेफळ येथील 28 वर्षीय पूजा काळे असे आईचे नाव असून
8 वर्षाची मुलगी व 9 महिन्याच्या मुलगा आहे
संध्याकाळी 5 वाजतापासून होते बेपत्ता
सर्विकडे शोधाशोध सुरू असताना विहिरीत सापडले तिघांचे मृतदेह
चान्नी पोलीस घटनास्थळी दाखल
बीड: पालीच्या तलावात दोन तरुणांचा बुडून मृत्यू
ओमकार काळे आणि शिव पिंगळे असं मयत तरुणांचे नाव
सायंकाळी फिरण्यास गेले होते तरुण
दोन्ही तरुण बीडच्या शिंदे नगरचे रहिवासी
बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल
Published On - Oct 19,2021 6:30 AM