AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varsha Gaikwad Compliant | वर्षा गायकवाड यांची सोनिया गांधींकडे तक्रार, थेट हायकमांडला पत्र लिहिल्यामुळे अचडणी वाढणार ?

शालेय शिक्षणमंत्री तथा काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याविरेाधात थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आलीय. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात गायकवाड यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या.

Varsha Gaikwad Compliant | वर्षा गायकवाड यांची सोनिया गांधींकडे तक्रार, थेट हायकमांडला पत्र लिहिल्यामुळे अचडणी वाढणार ?
varsha gaikwad
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 11:17 PM
Share

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री तथा काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याविरेाधात थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आलीय. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात गायकवाड यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची योग्य दखल न घेतल्यामुळे ही तक्रार करण्यात आलीय. थेट हायकमांडकडे तक्रार केल्यामुळे गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तक्रार नेमकी का केली ?

चिनाय आणि एमव्हीएलयू ही कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये अनुदानित महाविद्यालये आहेत. या ठिकाणी 800 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. मात्र महाविद्यालयाची ही जागा खासगी बिल्डरांच्या घशात घातली जाणार आहे. यामुळे ही महाविद्यालये वाचविण्यासाठी शर्मा यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे वेळोवेळी महाविद्यालयाची जागा वाचवण्याबाबात मागणी केली होती.

congress

congress letter

गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही

मात्र केलेल्या तक्रारीला गायकवाड यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असं शर्मा यांचं मत आहे. याच कारणामुळे आपण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून याविषयी तक्रार केली, अशी माहिती राजेश शर्मा यांनी दिली.

वर्षा गायकवाड काय उत्तर देणार 

दरम्यान, थेट सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार गेल्यामुळे वर्षा गायकवाड काय भूमिका घेणार तसेच तक्रारीचे उत्तर मागवण्यात आले तर त्या काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

‘आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा’, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

किरकोळ मारहाणीचं कारण, सांगलीत भयानक रक्तपात, दोघांचा खून, नेमकं काय घडलं?

अनुसूचित जातीतील 90 हजार युवक-युवतींना रोजगाराभिमूख प्रशिक्षण, सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; दरमहा स्टायफंडही मिळणार

(Congress state general secretary Rajesh Sharma complain about varsha gaikwad to sonia gandhi)

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट