रासप नाराज, महादेव जानकर आज निर्णय जाहीर करणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राष्ट्रीय समाज पक्षाला डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना शिवसेना-भाजप युतीने बारामतीतून उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी मात्र जानकरांना डावलून त्यांच्याच पक्षातील आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रासपला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज […]

रासप नाराज, महादेव जानकर आज निर्णय जाहीर करणार
Follow us on

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राष्ट्रीय समाज पक्षाला डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना शिवसेना-भाजप युतीने बारामतीतून उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी मात्र जानकरांना डावलून त्यांच्याच पक्षातील आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

रासपला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी रासपने स्व:बळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे महदाेव जानकरांवर कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. पुण्यात आज रासपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये महादेव जानकर आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून रासपला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे रासपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यामुळे रासपने निवडणूक लढवावी आणि स्वत:चे अस्तित्व दाखवावे अशी मागणी सध्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आता जानकर मेळाव्यात काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2014 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि महादेव जानकर यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये महादेव जानकर यांचा 69 हजार मतांनी पराभव झाला. त्यावेळी जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळात समावेश झालेल्या महादेव जानकर यांनी आपणच पुन्हा बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं वेळोवेळी जाहीर केलं होतं. ही जागा मिळावी यासाठी त्यांनी भाजपकडे हट्टही धरला होता. मात्र त्यांच्याच राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपनं जानकर यांना डच्चू दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आता जानकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह प्रत्येक पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये युती आणि आणि आघाडीच्या निम्म्या जांगावर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. भाजपने आपले मित्रपक्ष असलेल्या आरपीआय, स्वाभिमानी, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्षाला यंदा मात्र  डावलण्यात आले आहे. आतापर्यंत एकही लोकसभा निवडणुकीची जागा भाजपने मित्रपक्षाला सोडली नसल्यामुळे मित्रपक्षांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.