“गोपीनाथराव असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं, ते नसल्याने सत्ता गेली”

| Updated on: Jun 03, 2021 | 12:48 PM

मुंडे साहेब असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं, गोपीनाथ मुंडे बापमाणूस होते, गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली, असं महादेव जानकर म्हणाले (Mahadev Jankar on Gopinath Munde )

गोपीनाथराव असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं, ते नसल्याने सत्ता गेली
Gopinath Munde
Follow us on

प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, परळी : भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरुन (Gopinath Gad) ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रासप नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी बीडमधील परळी येथे गोपीनाथ गडावर हजेरी लावली. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो, तसा मी झालो, अशा भावना जानकरांनी यावेळी व्यक्त केल्या. (RSP leader Mahadev Jankar on Gopinath Munde Death Anniversary at Gopinath Gad Parali Beed Pankaja Munde)

“मुंडे साहेब बापमाणूस होते”

“गोपीनाथराव हे सामान्य माणसाला घडवणारे महानायक होते. मी पंकजा मुंडे यांच्या सुखाऐवजी दुःखात जास्त सहभागी आहे. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो. तसा मी झालो. मुंडे साहेब आज असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं. मुंडे साहेब बापमाणूस होते, गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष एनडीए सोबत आहे” असं महादेव जानकर ‘टीव्ही9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना म्हणाले.

“गोपीनाथ रावांच्या जाण्यानं मोठं नुकसान”

“गोपीनाथ मुंडे आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. येत्या काळात ओबीसींचं नेतृत्व हे पंकजा मुंडेंनी करावं आणि पंकजा ते करत आहेत. ओबीसींच्या कोट्यातून इतर कोणालाही आरक्षण देता कामा नये. गोपीनाथ रावांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं, त्याची जाणीव ही पदोपदी येते.” अशा भावना जानकरांनी व्यक्त केल्या.

“ओबीसींच्या आरक्षणाला हात लागता कामा नये”

“राज्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसींनी या राज्याची सत्ता हाती घ्यावी, सत्तेत ओबीसी असल्याशिवाय ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत. ओबीसींनो, सत्तेत या ही आमची भूमिका आहे, सगळ्या जातींना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला हात लागता कामा नये” अशी भूमिका जानकरांनी मांडली. (Mahadev Jankar on Gopinath Munde )

पंकजा मुंडे यांचं ट्वीट

संबंधित बातम्या :

‘भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय, सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेचा झाला’, एकनाथ खडसेंचा पुन्हा हल्लाबोल

(RSP leader Mahadev Jankar on Gopinath Munde Death Anniversary at Gopinath Gad Parali Beed Pankaja Munde)