Saamana : पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही, सामनातून राज ठाकरे आणि भाजपवर घणाघात

| Updated on: Apr 19, 2022 | 7:26 AM

देशातील जातील आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमिविणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिज ती म्हणजे, अशा पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) दोन ओवेसी एकत्र भारतीय जनता पक्षाचा (BJP) छुपा अजेंडा पुढे रेटीत आहेत व केंद्राचे सरकार हा सर्व प्रकार मुक दर्शक बनून पाहत आहे.

Saamana : पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही, सामनातून राज ठाकरे आणि भाजपवर घणाघात
सामनातून राज ठाकरें आणि भाजपवर घणाघात
Image Credit source: ani
Follow us on

मुंबई – “देशातील जातील आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमिविणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिज ती म्हणजे, अशा पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) दोन ओवेसी एकत्र भारतीय जनता पक्षाचा (BJP) छुपा अजेंडा पुढे रेटीत आहेत व केंद्राचे सरकार हा सर्व प्रकार मुक दर्शक बनून पाहत आहे. चांगल्या राज्यकर्त्याचे हे लक्षण नाही. ब्रिटीशांनी फोडा, झोडा व राज्य करा या नितीचा अवलंब केला. देशी राज्यकर्त्यांनी राज्य करण्यासाठी त्याच नितीचा अवलंब करावा लागत असेल तर स्वातंत्र्याचा संग्राम आणि बलिदाने वायाच गेली. दुसरे काय म्हणायचे !” असा टोला सामनातून (Saamana) मनसे आणि राज ठाकरेंना हिंदुं जननायक म्हणून लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरे हे हिंदुंह्रदयसम्राट होते

बाळासाहेब ठाकरे हे हिंदुंह्रदयसम्राट होते. पण ते धर्मांध नव्हते. एकदा त्यांनी स्पष्टचं सांगीतले होते. मला हिंदुंना जागे करायचे आहे. पण मला हिंदुंचा खोमेनी व्हायचे नाही. बाळासाहेंबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना मात्र हिंदुंचे ओवेसी व्हायची घाई झाली आहे. ही ईतकी घाई बरी नाही हे त्यांनी सांगयचे कोणी ? महाराष्ट्रात दोन ओवीसी एकत्र येऊन भाजपचा छुपा अजेंडा पुढे रेटीत आहेत. केंद्रसरकार मात्र हे मुकपणे पाहत आहे. चांगल्या राज्यकर्त्यांचे हे लक्षण नाही. राज ठाकरेंना अप्रत्यक्षरीत्या हिंदुं ओवेसी म्हणून टोला लगावला आहे.

देशात 2024 च्या निवडणूकांची भाजपची तयारी सुरू

ब्रिटीशांनी फोडा आणि राज्य करा याचं नितीचा अवलंब केला होता. देशी राज्यकर्त्यांना राज्य करायला याचं नितीचा अवलंब करावा लागत असेल तर, स्वातंत्र्याचा संग्राम आणि बलिदाने वायच गेली. दुसरे काय म्हणायचे! देशात 2024 च्या निवडणूकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. तयारी म्हणजे काय ? तर देशाचे वातावरण साफ बिघडवून टाकायचे. काँग्रेस राजवटीत दंगली होत होत्या असा ठपका भाजप ठेवायचे. पण आता राम नवमी आणि हणुमान जंयतीला दंगली होत आहेत त्याचे काय? केंद्रसरकारला देखील खडे बोल सुनावले आहेत.

Today’s petrol, diesel prices : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी, सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

Cristiano Ronaldo: हृदयद्रावक! रोनाल्डोचं नवजात बाळ दगावलं, ट्वीट करत काय म्हणाला रोनाल्डो?

Wardha attack : वर्ध्यातील एका वृत्तपत्राच्या संपादकावर प्राणघातक हल्ला! गाडी अडवून जबर मारहाण