AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले… संजय राऊत यांच्या पोस्टने मोठी खळबळ, दिला धडा घेण्याचा सल्ला

Sanjay Raut: अल्बेनियात सरकारविरुद्ध झालेल्या आंदोलवामुळे आणि सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत आग लावल्याच्या घटनेसंदर्भात संजय राऊत यांनी भारतालाही यातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधानांवर लावलेले आरोप आणि आंदोलकांच्या नाराजीची कहाणी जाणून घ्या...

Sanjay Raut: सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले... संजय राऊत यांच्या पोस्टने मोठी खळबळ, दिला धडा घेण्याचा सल्ला
Sanjay RautImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 11:11 AM
Share

शिवसेने (यूबीटी)चे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अल्बेनियात सरकारविरुद्ध सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाचा उल्लेख करत भारतालाही यातून शिकण्याचा सल्ला दिला आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अल्बेनियात लोक भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या पंतप्रधानांना न्यायपालिकेकडून मदत मिळत असल्याने नाराज आहेत. याच रागात आंदोलकांनी सरकारी संस्थांना लक्ष्य केले. राऊत म्हणाले की, सर्व देशांनी या घटनांमधून धडा घेतली पाहिजे, विशेषतः भारताने. इतकेच नाही तर संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात अल्बेनियाच्या सुप्रीम कोर्टाला आग लागल्याचे दिसत आहे.

संजय राऊत यांनी भारताला काय संदेश दिला?

शिवसेना (यूबीटी)चे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अल्बेनियातील घटनांचा उल्लेख करत भारतालाही यातून शिकवण घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, “अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले. सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने लोक भडकले होते. आंदोलक जनतेने संसद आणि सरकारी कार्यालयांवर, मंत्र्यांच्या घरांवर देखील हल्ले केले आहेत. सर्व देशांनी या घटनांपासून धडा घेतला पाहिजे.”

भारताच्या सुप्रीम कोर्टाने राऊत यांच्याकडून मागितले उत्तर

काही दिवसांपूर्वीच भारताच्या सुप्रीम कोर्टाने मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायपालिकेबाबत सार्वजनिकरीत्या केलेल्या टिप्पण्यांबाबत संजय राऊत यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने मात्र राज्यसभा सदस्य राऊत यांना पुढील सुनावणीत वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यापासून सूट दिली. खंडपीठाने म्हटले की, ते आधी त्यांच्या उत्तरावर विचार करतील.

हा वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा मुख्य न्यायाधीशांनी विरोधी पक्षांच्या एका प्रतिनिधीमंडळाच्या वैयक्तिक भेटीच्या विनंतीला स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांनी संकेत दिले होते की, हे प्रकरण याचिकेद्वारे न्यायालयासमोर मांडता येईल. त्यानंतर राऊत यांनी कथितरित्या काही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या होत्या. एससीबीएने राऊत यांच्या टिप्पण्यांवर आक्षेप घेत म्हटले की, न्यायपालिकेविरुद्धचे त्यांचे आरोप उपलब्ध रेकॉर्डच्या विरुद्ध आहेत.

Follow Us
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू