दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार; कुणाला संधी मिळणार का?

| Updated on: Oct 03, 2022 | 5:09 PM

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दिवाळीचा मुहूर्त असल्याचे संकेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार; कुणाला संधी मिळणार का?
Follow us on

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, खाते वाटप जाहीर करण्यास विलंब झाला. यानंतर आता चर्चा रंगलेय ती दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची. दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दिवाळीचा मुहूर्त असल्याचे संकेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे नागरिक सत्काराला आले असतांना माध्यमांशी बोलत होते.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी बच्चू कडूंना आशा आहे. जाहीर पणे अनकेदा त्यांनी मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याची नाराजी बोलून दाखवली होती.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात दुसरे नाव चर्चेत आहे ते संजय शिरसाट यांचे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.

यांना मिळाले पहिल्या मंत्री मंडळात स्थान

  1. राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  2. सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  3. चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  4. डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास
  5. गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  6. गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता
  7. दादा भुसे: बंदरे व खनिकर्म
  8. संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन
  9. सुरेश खाडे: कामगार
  10. संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  11. उदय सामंत: उद्योग
  12. प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  13. रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  14. अब्दुल सत्तार: कृषी
  15. दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा
  16. अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  17. शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क

दरम्यान, मंत्री पदावरुन शिंदे गटातील धुसफूस अजूनही सुरूच आहे. चांगल्या खात्याचा थोडा आग्रह धरला असता तर चांगलं मंत्रिपद मिळालं असतं, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पहिल्या मंत्री मंडळ विस्तारात काहींना जुनीच खाती देण्यात आली आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असताना या मंत्र्यांकडे जी खाती होती तीच त्यांना देण्यात आली. तर काहींना नवीन खाती देण्यात आली आहेत.