पवारांनी लेकीसाठी कंबर कसली, कुल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची सभा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

बारामती : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बारामतीत येऊन पवारांनी काय केलं विचारतात.. आणि आता पवारांना उपटून टाकू म्हणतात.. पण आता ते काय उपटणार आहेत कोणाला माहित, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शाहांची खिल्ली उडवली. इतकंच नव्हे, तर तुम्ही नाही त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला मोदींची स्तुती करायचीय. कौतुक करायचंय, काही […]

पवारांनी लेकीसाठी कंबर कसली, कुल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची सभा
Follow us on

बारामती : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बारामतीत येऊन पवारांनी काय केलं विचारतात.. आणि आता पवारांना उपटून टाकू म्हणतात.. पण आता ते काय उपटणार आहेत कोणाला माहित, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शाहांची खिल्ली उडवली. इतकंच नव्हे, तर तुम्ही नाही त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला मोदींची स्तुती करायचीय. कौतुक करायचंय, काही सांगायचंय सांगा.. पण भलतीकडे काही बोट घालू नका; तुम्हाला महागात पडेल, असा निर्वाणीचा इशाराही शरद पवार यांनी दिला. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवढ्या सभा झाल्या, त्यात त्यांनी मलाच लक्ष्य केलं. मला तर शंका वाटते की झोपेतही शरद पवार, शरद पवार, शरद पवार असं चावळत असतील, असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावला.

दौंड तालुक्यातल्या पाटस येथे महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रामराव वडकुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. काल एक गृहस्थ बारामतीत आले, अमित शहा.. त्यांनी पवारांनी काय केलं अशी विचारणा करत पवारांना उपटून टाकू असं म्हटलं.. आता ते काय उपटणार आहेत ते माहिती नाही, अशी खिल्ली उडवतानाच, तुम्ही नाही त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला मोदींची स्तुती करायचीय, कौतुक करायचंय, काही सांगायचंय सांगा.. पण भलतीकडे काही बोट घालू नका; तुम्हाला महागात पडेल असा इशाराही पवार यांनी दिला.

देशाच्या पंतप्रधानांनी राज्यात अनेक सभा घेतल्या. प्रत्येक सभेत एक विषय त्यांचा पक्का आहे तो म्हणजे शरद पवार. मला शंका वाटते की रात्री झोपेतही ते चावळत असतील शरद पवार, शरद पवार, शरद पवार, असं हातवारे करुन सांगत एक गोष्ट चांगलीय की ते एकटेच राहतात, त्यामुळे दुसर्‍यांची काही झोपमोड होत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींना टोला लगावला. सध्या भाजप नेत्यांनी बारामती मतदारसंघावर फारच लक्ष दिलंय. सगळ्यांना कौतुक वाटतंय की दिल्लीतून उठावं आणि बारामती मतदारसंघात जावं. सगळा देश या मतदारसंघातल्या जनतेला बघायला येतोय. बाकी कुठे जात नाहीत, पण त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातले सगळेच तालुके दिसतायत. कदाचित पवारांचं बोट पकडून आपण राजकारणात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितल्यामुळे दिल्लीतले सगळेच मंत्री येत असावेत. पण पुन्हा पंतप्रधान काय बोलतील आणि काय करतील याचा आपल्याला भरवसा राहिलेला नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.