BJP : महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री, आता उपराष्ट्रपतीपदीही माजी शिवसैनिकाचीच लागणार का वर्णी?

| Updated on: Jul 08, 2022 | 5:27 PM

आता उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असलेले सुरेश प्रभू हे शिवसैनिक होते. 1996 मध्ये त्यांनी तळकोकणातील राजापूर मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तर 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. तर 2009 मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन नेते निलेश राणे यांनी सुरेश प्रभूंचा पराभव केला होता.

BJP : महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री, आता उपराष्ट्रपतीपदीही माजी शिवसैनिकाचीच लागणार का वर्णी?
सुरेश प्रभू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये दिल्ली येथे बैठक पार पडली आहे.
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय राज्यालाच नाहीतर सबंध देशाला आला आहे. राज्यात (BJP) भाजपाने मोठी राजकीय खेळी केली असली तरी आता (President – Vice President) राष्ट्रपती- उपराष्ट्रपती निवडणुकीतही भाजपाचीच वेगळीच रणनिती राहणार का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून (Suresh Prabhu) सुरेश प्रभू यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. सुरेश प्रभू हे एक माजी शिवसैनिक राहिलेले आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांची आणि गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे बैठका पार पडल्या असल्याने या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय खेळीनंतर आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदी कोणाची वर्णी लागणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

सुरेश प्रभू हे माजी शिवसैनिक

आता उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असलेले सुरेश प्रभू हे शिवसैनिक होते. 1996 मध्ये त्यांनी तळकोकणातील राजापूर मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तर 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. तर 2009 मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन नेते निलेश राणे यांनी सुरेश प्रभूंचा पराभव केला होता. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना 2014 भाजपामध्ये आणत राज्यसभेची उमेदवारी दिली होती.

हे सुद्धा वाचा

राज्यसभेचा कार्यकाळ संपला अन् चर्चा

सुरेश प्रभू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपलेला आहे. शिवाय त्यांनी आता राजकारणातूनही निवृत्ती घेतली आहे. मात्र, आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच दरम्यानच्या काळात त्यांच्या आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यातील बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मूख्यमंत्री तर उपराष्ट्रपती माजी शिवसैनिक विराजमान होणार का अशी शक्यता निर्माण होऊ लागली आहे.

भाजपाचा दुहेरी उद्देश होणार का साध्य?

भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी काही शिवसेना खासदार करीत आहे. असे असतानाच दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप हे माजी शिवसैनिकाला संधी देत असल्याचा संदेश जात आहे. त्यामुळे माजी शिवसैनिकाच्या उमेदवारीनंतर शिवसेना खासदारांची मतांबाबतही विचार होऊ शकतो. त्यामुळे भाजपाकडून आथा सुरेश प्रभू यांनाच समोर केले जात आहे.