Aditya Thackeray : शिंदे गटाचा चॅलेन्ज आदित्य ठाकरे स्वीकारणार, पण आदित्य ठाकरेंकडूनही शिंदे गटाला चॅलेन्ज

| Updated on: Sep 07, 2022 | 11:08 AM

यंदा शिवाजी पार्कमध्ये नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मात्र शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच दसरा मेळावा होईल असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aditya Thackeray : शिंदे गटाचा चॅलेन्ज आदित्य ठाकरे स्वीकारणार, पण आदित्य ठाकरेंकडूनही शिंदे गटाला चॅलेन्ज
आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई : दरवर्षी शिवसेनेच्या वतीने शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेतला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून ही परंपरा सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील ही परंपरा सुरूच ठेवली. मात्र यंदा दसरा मेळाव्यावरून राजाकारण तापण्याची शक्यता आहे. कारण शिंदे गट (Eknath Shinde) देखील शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कमध्ये नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार शिंदे गट की आदित्य ठाकरे हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना शिवाजी पार्कमध्ये फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याचं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं आहे.

निवडणूक पुन्हा लढवून दाखवा

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. शिवाजी पार्कवर आम्हीच दसरा मेळावा घेणार आहोत असं चॅलेन्ज शिंदे गटाकडून शिवसेनेला देण्यात आले आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हे चॅलेन्ज स्विकारले आहे. सोबतच मी पण राजीनामा देतो, तुम्ही पण राजीनामा द्या, निवडणूक लढवून दाखवा. असं नव चॅलेन्ज आदित्य ठाकरे यांनी आता शिंदे गटाला दिले आहे. शिंदे गट आता आदित्य ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘दसरा मेळावा शिंदे गटाचाच’

दरम्यान दुसरीकडे शिंदे गट देखील शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. शिवाजी पार्कमध्ये शिंदे गटाचाच दसरा मेळावा होणार असं वारंवार शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. आज देखील मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी दसरा मेळावा नेमका कोणाचा होणार यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारावर चालतात. बाळासाहेबांच्या प्रथा पंरपरा कायम ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. त्यामुळे यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याचा दावा केला जात असल्याने, यंदा शिवाजी पार्कवर नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.