शिवसेना नगरसेवकांनी आपल्याच नगरसेवकाचं कार्यालय फोडलं

विधानसभा निवडणूक (Assembly Election) जवळ येत असताना राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या हालचालींना वेग येत आहे. शिवसेनेत बदलापूर (Badlapur) येथे अशाच प्रकारे विधानसभा निवडणुकीचा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेना नगरसेवकांनी आपल्याच नगरसेवकाचं कार्यालय फोडलं
Follow us
| Updated on: Sep 11, 2019 | 3:55 PM

ठाणे : विधानसभा निवडणूक (Assembly Election) जवळ येत असताना राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या हालचालींना वेग येत आहे. बदलापूर (Badlapur) येथे अशाच प्रकारे विधानसभा निवडणुकीचा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालं. यातून शिवसेनेच्याच नगरसेवकांनी (Shivsena Corporator) शिवसेनेच्या नगरसेवकाचं कार्यालय फोडलं. या तोडफोडीमुळं शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.

बदलापूरमधील शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे (Shailesh Vadnere) विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यावरुन झालेल्या वादात शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनी वडनेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचं बोललं जात आहे.

बदलापूरमधील राजकीय गणितं काय?

बदलापूरमध्ये भाजपचे (BJP) विद्यमान आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी शिवसेना नेत्यांशी जवळीक साधण्याचीही चर्चा आहे. आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे हे जुने कट्टर विरोधक होते. मात्र, मागील काही काळात ते जवळ आल्याचं पाहायला मिळालं. कुळगाव, बदलापूर आणि अंबरनाथ भागात शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक मदभेद असल्याचं बोललं जातं.

मागील अनेक वर्षांपासून बदलापूरमध्ये विद्यमान आमदार किसन कथोरे यांचं वर्चस्व राहिलं आहे. शिवसेनेने या वर्चस्वाला आव्हान देत बदलापूर नगरपालिकेवर ताबा मिळवला. यासाठी शिवसेनेकडून आमदार कथोरे यांच्यावर जोरदार टीकाही झाली आहे. माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही आमदार कथोरे यांच्यावर शहरात एकही काम नीट न केल्याचा आरोप केला होता.

मागील काही महिन्यांपासून मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले कथोरे आणि म्हात्रे आता अगदी मित्रांप्रमाणे वावरताना दिसत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात बदलापूर विधानसभा मतदारसंघ कुणाकडं जाणार आणि तेथील उमेदवार कोण असणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे याबाबत कोणतीही स्पष्टता नसताना शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये मात्र टोकाचे मतभेद झालेले दिसत आहेत. त्याचं रुपांतर आज थेट तोडफोडीत झालं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.